सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील करमाळा तालुक्यातील डिकसळ चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी
केत्तूर ( अभय माने) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेबरोबर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे जागोजागी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून या पथकाद्वारे आत्तापर्यंत राज्यात कोट्यावधी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोली जवळील सोलापूर पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलावर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.असे करमाळ्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील मार्गावर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. वाहनांमध्ये अवैद्य रोकड,शस्त्रास्त्रे,तसेच दारूवर निर्बंध घालण्यासाठी चेक पोस्ट उभारण्यात आली आहेत.यावेळी करमाळा पोलीस उपनिरीक्षक पोपीरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल ढेंबरे,सौदागर ताकभाते,बालाजी घोरपडे यांच्यासह कृषी विभागातील पथकप्रमुख फारूक बागवान,
क्षितिज महिला ग्रुप कडून श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
ग्रामसेवक सहाय्यक पथक प्रमुख शरद जगदाळे,व्हिडिओग्राफर उस्मान शेख आदि कर्मचारी कार्यरत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील,पोलीस निरीक्षक विनोद घुगे,तहसीलदार शिल्पा ठोकडे हे देखील या चेकपोस्टला वेळोवेळी भेटी देत आहेत.