क्राइममहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक: प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून….

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून….

मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी मयत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे.

मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग मधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही क्रूर घटना घडली आहे. या सदनिकेत मनोज साने वय 56 आणि त्याची रुम पार्टनर मयत सरस्वती वैद्य वय 32 हे दोघे राहत होते. मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येथे राहत होतं.

आरोपी मनोज सानेला मयत सरस्वती वैद्यचं कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय येत होता. त्यामुळे मागील 3 ते 4 दिवासांपासून या दोघांचं भांडण सुरु होतं. मयत सरस्वती वैद्य हिने दोन ते तीन दिवसांपूर्वीच विष पित आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस पोलीस आपल्याला कारणीभूत ठरवतील या भितीने त्याने मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची शक्कल लढवली.

 आरोपीने मयताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कटर मशीनने तुकडे तुकडे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो ते तुकडे कुकरमध्ये बॉईल करायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचा आणि फेकून द्यायचा. त्याने सोसायटीच्या मागील बाजूच्या गटारातही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो आपल्या बाईकचा वापर करायचा. पोलिसांनी राञी उशिरा हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व सामान तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे. 

litsbros

Comment here