क्राइमपुणे

धक्कादायक! कोयता-कुऱ्हाडीने वार करत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! कोयता-कुऱ्हाडीने वार करत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या 

जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांचा जीवघेण्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. कोयता, तलवार आणि कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यामध्ये पानसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर 6 ते 7 ठिकाणी वार करण्यात आले होते, त्यांच्या मानेवर गंभीर जखम झाली होती. पुढच्या उपाचारांसाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आलं होतं, पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

जमिनीच्या वादातून पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेहबुब पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी कुऱ्हाड आणि कोयत्याने मारहाण करणाऱ्या वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. या शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे आणि त्यांच्याबरोबर इतर तिघेजण हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भांडण झाले. यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले, यात तिघे जण जखमी झाले.

litsbros

Comment here