क्राइममहाराष्ट्र

लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या

बीडमधील गेवराई या ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची उत्तर तपासणी केल्यानंतर त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झालं. यानंतर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणाच्या धाकट्या भावानेच ही हत्या केली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36 वर्ष रा. रंगार चौक, गेवराई ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर दर्शन पुंड असे आरोपी भावाचे नाव आहे.

गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तान परिसरामध्ये एका पत्राच्या शेडमध्ये दर्शन पुंड आणि त्याचा मित्र आनंद बाबते यांच्यासह अन्य तीन साक्षीदारांनी मनोहर पुंड याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याचा खून केला. मनोहर याचा खून करुन हे सर्वजण घरी परतले. त्यानंतर या परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवत तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. त्या उत्तरीय तपासात मनोहर याचा खून झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि अवघ्या तीन तासांत खून करणाऱ्या आरोपींना अटक केली.

रोजच्या त्रासाला कंटाळून केली हत्या

पोलिसांना आढळून आलेला मृतदेह मनोहर पुंडचा असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळवली आणि त्याचा लहान भाऊ दर्शन पुंड याला घटनास्थळी बोलावले. मात्र, दर्शन घटनास्थळी येण्यास नकार देत होता. तसेच पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यासाठी जवाब दे म्हटले तरी तो नकार देऊ लागल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आपणच मित्रांच्या मदतीने मनोहरला मारहाण करुन हत्या केल्याचे त्याने कबूल केले. माझ्या भावाने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. तसेच तो दारु पिऊन घरी येऊन नेहमी त्रास देत असे, यालाच वैतागून मी आरोपी माऊली आनंद बाप्ते (वय 30 रा. रंगार चौक) आणि त्याच्या अन्य 3 साथीदारांसह मोठ्या भावाची हत्या केली.

litsbros

Comment here