सोलापूरमध्ये थेट पोलीस निरीक्षकाचे घर फोडले
लाखोंचा मुद्देमाल लंपास
सोलापूर : सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या घरात ही चोरी झाली आहे.
चोरट्यांनी सहा लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे.
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या घरात चोरी झाली आहे.
ही चोरी १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली आहे.पोलीस निरीक्षक
वरिष्ठ अश्विनी भोसले या मुंबईला आईला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या नंतर चोरीची घटना घडली आहे.याबाबत एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याच्या वरिष्पोलीस निरीक्षक
अश्विनी भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या चोरीने सर्वच पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे,कारण चोरटे
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा घर असो किंवा कुणी सर्वसामान्याचे घर असो,चोरी करणारच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अश्विनी भोसले कार्यरत आहेत.सोलापुरातील विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी आश्विनी भोसले यांनी काम केले आहे.सदर बाजार,सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदी अश्विनी भोसले यांनी काम पाहिले आहे. सद्यस्थितीत एम.आय.डी.सी. पोलीस पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदी अश्विनी भोसले कार्यरत आहेत.सोलापूर शहरात विजापूर रोड परिसरात पाटील नगर येथे राहावयास आहेत.
घरगुती कामानिमित्ताने १६ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान मुंबईला गेल्या असता,
चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाचे घर फोडले.चोरी होऊन जवळपास आठवडा झाला,
परंतु सोलापूर शहर पोलिसांनी माहिती प्रसिद्ध केली नव्हती.
ऑनलाइन एफ.आय.आर.मुळे सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडल्याची माहिती समोर आली आहे.एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वराष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी १२० ग्रॅम वजनाच्या सहा बांगड्या आणि पस्तीस हजार रुपयांची रोखड घरात ठेवून आजारी आईला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या.
बंद घराची रेखी करून संशयित अज्ञात चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेल्या बांगड्या आणि रोखड लंपास केली.मुंबईहून परत आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या लक्षात आले,अज्ञात चोरट्याने घरातील बांगड्या आणि रोखड लंपास केले आहे.एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.अधिक तपास पी.एस.आय.गायकवाड करत आहेत.
Add Comment