क्राइममहाराष्ट्र

धक्कादायक! भावानेच काढला दोन सख्ख्या बहिणींचा काटा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा

अलिबागमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. भावानेच सख्ख्या बहिणींचा जीव घेण्यासाठी धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे. मालमत्तेच्या लालसेतून भावानेच सख्ख्या बहिणींचा काटा काढला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना रेवदंडा याठिकाणी घडली. सोनाली मोहिते आणि स्नेहा मोहिते अशी या मृत बहिणींची नावे आहेत. आरोपी गणेश मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. 

दरम्यान, भावाने बहिणींची हत्या करण्यासाठी डोक्याने कट रचला होता. आरोपी गणेश मोहिते याने बहिणींचा काटा काढण्यासाठी सुपात उंदीर मारण्याचे विष टाकून ते दोघींना प्यायला दिले. यामध्ये त्यांचे निधन झाले.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बहिणी संमती पत्र देत नव्हत्या. यामुळे हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याचा राग गणेशच्या मनात होता. तसेच दोघींना संपवले तर वडिलोपार्जित मालमत्ता आपल्यालाच मिळेल, असेही त्याला वाटले.

यामुळे गणेशने अत्यंत शांत डोक्याने हे कृत्य केले आहे. त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने दोघींसाठी सूप बनवले होते. त्यामध्ये विषारी औषध टाकून दोन्ही बहिणींना ते पिण्यासाठी दिले. त्यानंतर दोघींचाही मृत्यू झाला. 

धक्कादायक माहिती म्हणजे, गणेशने कट रचण्यापूर्वी गुगलवर सर्च करुन सर्व माहिती मिळवली होती. कोणते विषारी औषध जेवणातून व पाण्यातून दिले तर वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी 50 ते 60 वेळा गुगलवरुन माहिती घेतली होती.

litsbros

Comment here