विचारवंत शिक्षक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला
प्रतिनिधी ; समाजहिताची भूमिका घेऊन प्रबोधन करणारे विचारवंत व नगर जिल्ह्यातील शिक्षक हेरंब कुलकर्णी यांच्यावर तीन अज्ञात समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे . याबाबत त्यांच्या पत्नींनी सोशल मीडियावर पोस्ट करून खालील प्रमाणे माहिती दिली आहे.
मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे
माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर
दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.
त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.
आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे…
सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.
प्रतिमा कुलकर्णी
9921288521
Comment here