*करमाळा तालुक्यातील गुलाबी थंडी होऊ लागली बोचरी*
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसापासून गुलाबी थंडीची जागा बोचऱ्या थंडीने घेतली असली तरी, दुपारी मात्र कडक ऊन पडत आहे तर सायंकाळी शितलहरी वाढत असल्याने हवेमध्ये चांगलाच गारवा वाढला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय समाधानकारक असा पाऊस झाला यामुळे शेतकरी राजा आनंदित झाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीपर्यंत थंडीचा मागमूसही नव्हता, मात्र आधूनमधून थंडीची उघडझाप सुरू झाली होती. मात्र एकसारखी थंडी अद्याप पडली नव्हती यामुळे शेतकरी राजा पुढील गव्हाची पेरण्या करण्यच्या प्रतीक्षत होता. 24 तासात कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर वाढू लागला आहे.यावर्षी सर्वत्रच पाऊस अधिक झाल्याने यापुढे थंडीत वाढ होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविली जात आहे.
हेही वाचा – पाणलोट अन पोमलवाडी ……. ( माझी 50 वर्षांपूर्वीची पोमलवाडी )
थंडी वाढताच उबदार कपड्यांना मागणी वाढली असून गाठोड्यात ठेवलेली मफलर,स्वेटर, कानटोप्या, बाहेर येऊ लागलेल्या आहेत.तसेच थंड वातावरण हे पेरणी झालेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी लाभदायक ठरणार आहे.