करमाळासोलापूर जिल्हा

बिटरगाव वांगी येथील आजिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बिटरगाव वांगी येथील आजिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

करमाळा(प्रतिनिधी) ;
बिटरगावं वा येथील अजिनाथ शंकरराव पाटील (नाना)यांचे ९३व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पच्छ्यात ४मुले ३मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे.नानांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती १९६७ ते१९७२ दरम्यान उपसभापती भूषवले.तसेच बिटरगावं वा चे सरपंच व खरेदी विक्री संघाचे संचालक व बिटरगाव सोसायटी चे चेयरमन अशा विविध पदावर काम केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक नंतर पोलीस पाटील पदी काम केले.

या अष्टपैलू व्यक्तीमत्वच्या जाण्याने या भागावर शोककळा पसरली आहे. तसेच ते देशभक्त नामदेवराव जगताप यांचे राजकीय सहकारी म्हणून परिचित होते. तसेच ते माजी राज्यमंत्री दिगंबररावजी बागल यांच्या बहिणीचे सासरे होते.

हेही वाचा – सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; करमाळ्यातील लीड स्कुलमध्ये शौर्या किशोर शिंदे प्रथम

आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

तसेच करमाळा कृषी उत्पन बाजार समिती करमाळा संचालक कुलदीप पाटील व प्रगतशील बागायतदार महेंद्र पाटील व झोनल ऑफिसर बॅकं ऑफ महाराष्ट्र आंनदराजे पाटील यांचे आजोबा होते.

litsbros