आम्ही साहित्यिक

भाज्यांचं संमेलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🚴🚴🚴 भाज्यांचं संमेलन 🚴🚴🚴
_______________
खरं तर आजचा विषय जरा जवळचा वाटतोय कारण आपल्याला रोजच्या स्वयंपाकात म्हणजे जेवणामध्ये विविध प्रकारच्या भाज्या लागतात तर एकदा जवळच असलेल्या मंडईमध्ये गेलो तेव्हा कळालं काही भाज्या मी खाल्ल्या काय पाहिल्या सुद्धा नव्हत्या मंडई मधल्या सगळ्या भाजी विक्रेत्यांकडच्या भाज्या पोत्यामध्ये… काही टोपल्यामध्ये…तर काही ढिगारे मांडून…ठेवलेल्या होत्या पण एक जण चांगला गुडघाभर उंचीचे दहा-बारा ॲल्युमिनियमचे उभे डेग आणि त्याच्यामध्ये त्यानी ज्या भाज्या ठेवलेल्या होत्या त्यानी जी नाव सांगितली त्यातली कॅक्टस सारख्या दिसणाऱ्या काटेरी अंगाच्या कित्येक भाज्या होत्या फक्त ओळखीची होती ती वल्ली हळद म्हणजे दिसायला आपल्या आल्या सारखी मिळती जुळती पण तो माणूस त्या प्रत्येक भाजीवर बाकीच्या विक्रेत्याकडं हाताने पाणी मारायचे पण हा माणूस स्प्रे पंपानी पाणी मारायचा म्हणजे एक मन असं वाटलं या सगळ्या भाज्यांनी म्हणजे पालेभाज्या…शेंग भाज्या…आणि फळभाज्या…यांनी एकत्र येऊन एकत्र संमेलन भरवायचं ठरवलं तर!


रामभाऊ पाटलांच्या शेतातला एक कोपरा तसं बघायला गेलं तर शेतच गावाच्या बाहेर बाजूला छोटसं शेततळं…शेजारी विहीर… विहिरीवर मोट… तिच्या चाकामधून कुई कुई आवाज काढणारी सर्जा राजांची बैलजोडी…दर पाच मिनिटांनी जवळजवळ 200 लिटर पाण्याची एकमोट नियमितपणे त्या पाण्याच्या चौकटी खड्ड्यात टाकायचा ती पाणी शर्यतीत धावल्यावानी वाफ्यामध्ये शिरायसाठी जीव घेऊन पळायचं अन मग रामा पाटलाचा मळा बहरायचा अशा या हिरव्यागार मळ्यामध्ये सगळ्या भाजीपाल्यांनी संमेलन भरवायचं ठरवलं आणि इथं खरं भाज्यांच्या संमेलनाला सुरुवात झाली संमेलनाला अंबाडी…अळू… काकडी…कांदा…कारले…कोबी…गवार..घोसाळे…दोडका…घेवडा…चाकवत…दुधी…पडवळ… पाथरी… पालक…तांदळी…मुळा… मेथी….वांगी…शेपू…शेवगा…कोथिंबीर… चुका…भोपळा…माठ… टोमॅटो…कटली…तोंडली…सिमला हिरवी मिरची फ्लावर…नवलकोल…वरण्या…वाटाणा… उसावरच्या शेंगा…हरभरा…या भाज्यांना निमंत्रण धाडली गेली आणि रामभाऊच्या मळ्यामध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं.


भाज्यांचे हे सगळे प्रतिनिधी संमेलनाच्या दिवशी वेळेत उपस्थित राहिले रामभाऊच्या मळ्यामध्ये सगळीकडे एकूण एक भाज्यांचा आनंद ओसंडून वाहत होता आज त्या प्रत्येकाला आपल्या मनातली खदखद मांडायची संधी चालून आलेली होती त्यामुळे संयोजक लोकांनी त्यांची आज योग्य बडदास्त ठेवलेली होती सर्वांना सजवलेल्या टोपलीमध्ये बसवलं होतं त्या सर्वांवर पाण्याचा वरचेवर शिडकावा मारला जात होता सर्वांना माळ्याच्या मळ्यातील गीतं ऐकवली जात होती एकूणच संमेलन आनंददायी होईल याची दक्षता घेतली जात होती प्रथम स्वागताध्यक्ष दुध्या भाऊ व्यासपीठावर उभे राहिले त्यांनी फॉरमॅलिटी प्रमाणे सर्वांचे उभे राहून स्वागत केले संमेलनाच्या अध्यक्षपदी दीर्घायुषी भोपळे दादांना बसवण्याची विनंती केली विनंतीला मान देऊन भोपळे दादा खुर्चीवर विराजमान झाले आणि सर्व भाज्यांनी टाळ्यांच्या गजरात रामभाऊचा मळा दुमदुमून टाकला स्वागत पर प्रास्ताविकाला भोपळे दादा उठले माझ्या भाज्या भगिनींनो आजचे हे ऐतिहासिक भाजी संमेलन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत आहे आजकाल आपणा सर्वांवर अन्याय केला जात आहे रासायनिक औषधांची फवारणी करून आमचा मूळ स्वाद हिरावून घेऊन आम्हाला विषारी बनवलं जातंय त्यामुळे आमची प्रतिष्ठा कमी होऊ लागलेली आहे आपण मुके असल्याने काहीचं बोलू शकत नाही एवढेच काय आपल्याला चाकू सूऱ्यांचा धाक दाखवला जातोय पुढील प्रवास तर विचारूच नका आमचा छळ करून आमचं पोषणमूल्य हिरावून घेतलं जात आहे त्यासाठी सेंद्रिय भाजी…फळे… फुले पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा सुरू आहे आम्हाला शोधत शोधत काहीजण मंडईचा रस्ता धरतात प्रस्ताविकातच मणभर तेल जाण्यापेक्षा मी सर्वांना बोलण्याची संधी देणार आहे त्यामुळे तुम्हाला टोमॅटो ताईकडून सूप आणि माझ्याकडून गोड पुऱ्या म्हणजे घारगे देऊन शांत करणार आहे त्यामुळे मधून कोणी पळून जाऊ नये ही विनंती

प्रथम अंबाडी आजींना बोलण्याची संधी देण्यात आली अंबाडी आजी आपल्या भाषणात म्हणाल्या बाबांनो आता माझं वय झालंय मी म्हातारी झाली पूर्वी लोक मला ताटात घ्यायचे आज मी ताटाच्या बाहेर पडले मी किती पौष्टिक आणि औषधी आहे हे नव्या पिढीला काय माहिती
आम्हाला शहरांमध्ये असलेल्या मॉलमध्ये प्रवेश सुद्धा दिला जात नाही त्यामुळे मी दुःखी होते मी तशी मूळची कर्नाटकातील पण सीमा प्रश्न सुरू झाल्यापासून माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागले माझी भाजी ज्यांनी खाल्ली त्याला माझी चव आंबट…तुरट…रुचकर…सारक…अग्नि दीपक असल्याने मला रट रटून शिजवल्याशिवाय समाधान होत नाही तसं बघायला गेलं तर माझ्या सेवनामुळे खरूज…गजकर्ण…इसब… जळवात… इत्यादी त्वचा विकार बरे होतात त्यासाठी माझी भाजी तांदळाच्या कण्या आणि डाळ घालूनच करावी लागते तर माझा मॉलमध्ये व घराघरात प्रवेश झाला पाहिजे व मी म्हातारी आहे म्हणून मला बाजूला करू नका मला आरक्षण द्या आणि माझं रक्षण करा नंतर कारले मावशींना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांचा चेहरा जरा रागावल्यासारखाच दिसत होता त्यांच्या अंगावर शहारे उठून दिसत होते काही लोक माझा द्वेष करतात हे मला माहिती आहे कडू कारलं तेलात तळलं तुपात घोळलं तरी कडू ते कडूच असं माझं नाव बदनाम करतात पण मी किती औषधी आहे हे या पिढीला किंवा तुम्हाला शुगर झाल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळे त्वचारोग… कृमीनाशक… मलमेदक…या व्याधीवर रामबाण आहे त्यामुळे आम्हाला शहरी मॉलमध्ये पण स्थान मिळाले पाहिजे माझं शरीर काटेरी जरी असलं तरी मन किती प्रेमळ आहे ते पहा माझा स्वीकार करा या भाषणाला कडकडून टाळ्या वाजवून साद दिली गेली त्यानंतर कोबी दादांना बोलण्यासाठी उभा करण्यात आलं सज्जन हो माझ्या जाडीवर जाऊ नका माझं रक्षण करण्यासाठी माझ्या पाकळ्याच चिलखतासारखं काम करतात
मी पान कोबी आहे मला आणखी दोन सावत्र भाऊ आहेत ते फ्लावर कोबी आणि गड्डा कोबी म्हणजे नवलकोल त्यामुळे आम्हाला मागणी खूप आहे.

पित्तज्वर…खोकला…रक्तदोष याच्यावर आम्ही तिघे भाऊ काम करतो आमचा भाजीमध्ये वरचा क्रमांक आहे त्यामुळे आम्हाला राखीव जागेवर आरक्षण असले पाहिजे अन आरोग्य मित्र म्हणून आमचा गौरव झाला पाहिजे त्यानंतर आपल्या आदरणीय शेपुताई… मेथी ताई कोथिंबीर बाई बोलण्यासाठी उठल्या अध्यक्ष महोदय आमचे आयुष्य अल्प असल्यामुळे आणि आम्ही दोघी जावा जावा असल्यामुळे एकीला बाजूला ठेवलं जातं आणि एकीला डोक्यावर घेतलं जातं काहींना माझा स्वाद आवडत नाही पण कोथिंबीर बाईंना जगातील किचनमध्ये आदराचे स्थान आहे जेवणात आमच्यामुळे स्वाद वाढतो कफ…वात…दाह…आम…अपचन…
पोटदुखी यावर आमचा रामबाण उपयोग होतो तरी आम्हाला दीर्घायुष्य करण्यासाठी काहीतरी उपाय शोधले पाहिजेत तरी आम्हाला अभय मिळावं एवढीच अपेक्षा आहे मेथी ताईंना या दोघींचे विचार आवडले व त्या आनंदित झाल्या इतक्यातच अध्यक्ष महोदयांनी एक सूचना केली की बंधू-भगिनींनो फार वेळ होत आहे त्यानंतर फक्त दोघांनीच बोलावे त्यानुसार त्यांची दखल घेतली जाईल त्यामुळे सर्वांनीं अध्यक्षांच्या नियमाचं पालन केलं त्यानंतर गाजरे मॅडम बोलण्यासाठी उभा राहिल्या अध्यक्ष महोदय मी सर्वांची लाडकी आहे मला मान आहे मला माझ्या शरीराचा अभिमान आहे पण लोक जेव्हा बोलतात गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली त्यामुळे माझ्यावर काही लोक विश्वास टाकायला घाबरतात मला सांगा मी काय पुंगी आहे का सांगा सांगा सर्वांनी टाळ्या वाजवल्या माझा हलवा… खीर… वड्या… भाजी… कोशिंबीर मध्ये…सॅलड…सूप… भात… व ज्यूस काढून आपले आरोग्य फिट राखतात डोळे चमकदार राहतात एकूणचं आरोग्य रक्षक म्हणून मला पारितोषिक मिळावं
त्यानंतर सिमला मिरची ताई उठल्या मी सर्वांची आवडती मला मार्केट व मॉलमध्ये मान आहे तशी मी आता विविध रंगांमध्ये पुढे येत आहेत पण मला ढब्बू …ढोबळी…म्हणून हिणवले जाते मी काय ढोबळी आहे काय हो शिमल्याहून आलेली मी सुंदरी त्यामुळे माझा द्वेष करू नका मला सर्व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये… विविध भाज्यांमध्ये माझा समावेश होतो जायकेदार डिश म्हणून मला सर्व्ह केलं जातं त्यामुळे मी भाज्यांची महाराणी आहे यांचा वांदा करण्यासाठी कांदे दादा उठले आणि त्यांनी आपलं भाषण सुरू केलं महोदय मी दीर्घायुषी असल्यामुळे माझा कार्यकारीणीमध्ये समावेश झाला पाहिजे. सर्व घरांमध्ये माझा वावर…दरवळ असताना मला बाजूला का ठेवलं जातं माझी किंमत कधी कधी कवडीमोल करून माझ्या मालकाच्या डोळ्यात पाणी आणलं जातं त्यामुळे मी सर्व भगिनींना रडवतो तरी माझा सन्मान करावा दरवर्षी कांदे नवमी मोठ्या प्रमाणात साजरी करावी कॉलरा… मुळव्याध…त्वचा…कान यांचे रोग दूर करीत असतानाच मला बुक्कीचा धाक दाखवू नका नाहीतर सगळे रडाल एवढे बोलून कांदे दादा गडगडत आपल्या जागेवर बसले
आता इतक्या भाज्यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर ज्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही ते अर्थातच चिडणार एकच हलकल्लोळ माजला सभागृह सोडून भाज्या जाण्याची तयारी करू लागल्या तेव्हा अध्यक्षांनी दखल घेऊन त्यांना जाण्यापासून रोखलं शेवटी अध्यक्ष महाराज भोपळे दादा बोलु लागले ते म्हटले मला तुमच्या व्यथा कळाल्यात सर्वांच्या भावना मी जाणू शकतो आपण सर्वांनीं बलिदान केल्याशिवाय मनुष्य जात निरोगी राहूच शकत नाही त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी भाज्यांच्या विभूती हे विसरून चालणार नाही आपणा सर्वांचा परोपकारक हा गुण मानव जातीने घेण्यासारखा आहे आम्हाला पाहून आजार देखील पळून जातात माझेच पहा मी अंगाने जाडजुड असल्यामुळे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून तर लोक मला चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणत माझी खिल्ली उडवतात तरीही मी शांत राहतो राग आग आहे हे मला माहित आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मला सुरक्षित ठेवले जातं वेळ आली की सूरी चालवून माझा वापर केला जातो तसेच आपणा सर्वांचे आहे त्यामुळे तुमच्या व्यथा या माझ्या व्यथा आहेत या विचाराशी मी सहमत आहे आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात रामभाऊचा भाजीचा मळा फुलवलात आपणा सर्वांचे मी आभार मानतो अल्पोपहार घेऊन आपण मार्गस्थ व्हावे व आपल्या व्यथांची शिफारस योग्य त्या ठिकाणी करण्यात येईल व सर्व लोकांनी श्रावणामध्ये देशी भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा अशी इच्छा मी बाळगतो व तसा संदेश सर्व लोकांना देतो आणि या भाज्यांच्या संमेलनाचा समारोप अध्यक्षांच्या भाषणाने झाला
संमेलनाच्या परिसराला गाजरे मॅडम संकुल… व व्यासपीठाला आदरणीय दुधिया भाऊ भोपळे व्यासपीठ असं नामकरण करण्यात आलं होतं बाहेरच्या पटांगणामध्ये आपण आपल्या टू व्हीलर…फोर व्हीलर… पार्किंग करतो त्याप्रमाणे इथं भरपूर टोपल्या दिसल्या कारण या भाज्या या सर्व टोपल्या मधून कार्यक्रमाच्या स्थळी आलेल्या होत्या आणि त्या व्यवस्थित रित्या दोन रांगेमध्ये पार्किंग करून ठेवलेल्या होत्या
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here