माढासोलापूर जिल्हा

अवैध दारू विक्री महिलांसह वंचित बहुजन आघाडी आक्रमक अंजनगाव खेलोबा व परिसरातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अवैध दारू विक्री महिलांसह वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अंजनगाव खेलोबा व परिसरातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याची मागणी

 माढा प्रतिनिधी 
अंजनगाव व परिसरातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याकरिता, अंजनगाव नूतन ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला विलास नाईक व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पोलीस स्टेशनचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून अंजनगाव व अंजनगाव परिसरामध्ये अवैध दारू विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.या विषयी अंजनगाव ग्रामपंचायत मध्ये दिनांक 26/01/2024 रोजी ग्रामसभा
घेण्यात आली.

या सभेमध्ये सूचक, चंद्रकला विलास नाईक व अनुमोदक, समाधान धोंडिबा इंगळे यांनी दिलेल्या दारूबंदीचा हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
ग्रामसभेमध्ये ठराव क्रमांक 4 नुसार हा ठराव करण्यात आलेला आहे . कारण अंजनगाव व परिसरातील अनेक ठिकाणी, हॉटेलवर व धाब्यावर तसेच गावात देखील अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचप्रमाणे किरकोळ दारू विक्रेते अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. परिणामी, गावातील शांतता भंग होत आहे. गावात वारंवार भांडणतंटे ,मारहाण असे प्रकार घडत आहेत.तसेच दारूमुळे युवावर्ग नशेच्या आहारी जात आहे.अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत.

दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुणांनी आपला जीव गमवला आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील अवैध दारू त्वरित बंद करावे अन्यथा, अंजनगाव मधील महिलांचा मोर्चा तसेच वंचित बहुजन आघाडी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

यावेळी निवेदन देताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, तसेच, वंचित बहुजन आघाडी अंजनगाव अध्यक्ष, तुषार शिंदे. उपाध्यक्ष, नितीन भडकवाड. व वंचित बहुजन यूवा आघाडीचे अध्यक्ष, धीरज नाईकनवरे. कार्याध्यक्ष, प्रेम नाईकनवरे. सहसचिव, प्राची नाईकनवरे. संघटक अक्षय नाईक, NDMJ सामाजिक कार्यकारी संघटना. तालुकाध्यक्ष, रोहित रावडे, आदित्य शिंदे. तसेच, सोलापूर जिल्हा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष, दादा नाईक उपस्थित होते.

litsbros