करमाळासोलापूर जिल्हा

अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे नगर परिषद कर्मचारी व मौलालीनगर येथील नागरिकांमध्ये वादावादी व तणाव; युवानेते शंभूराजे जगताप यांची मध्यस्थी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे नगर परिषद कर्मचारी व मौलालीनगर येथील नागरिकांमध्ये वादावादी व तणाव; युवानेते शंभूराजे जगताप यांची 

करमाळा(प्रतिनिधी); यावर्षी पावसाळा लांबल्या मुळे व अनेक शहरांना पाणी पुरवठा असणाऱ्या उजनी धरणाने अक्षरशः तळ गाठला.करमाळा शहराला पाणीपुरवठा जेथून होतो त्या पंपहाऊस जवळील पाणी संपल्या मूळे चारीने पाणी पंपहाऊस पर्यंत आणावे लागले हे काम करण्या साठी काही दिवस लागले . त्यामूळे करमाळा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला . शहराला सुरुवातीला दिवसा आड नंतर दोन – तिन दिवसाला नंतर आठवड्यातून एकदा पाणी अशी परिस्थीती निर्माण झाली.

त्यामूळे शहरवासियांचे हाल झाले. ऐन जून संपला जुलै महिना पण संपत आला पण पाऊस काही पडेना त्यामूळे दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण मागील आठवड्या पासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे ही दिलासादायक बाब आहे . पण उजनी धरण अजून मायनस मध्ये आहे . मागील दोन – तिन दिवसा पूर्वी उजनी धरणाच्या करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊस येथे तांत्रिक बिघाड झाला होता.

मात्र करमाळा शहरातील मौलाली नगर येथे पाणीपूरवठा बंद असल्याने येथील नागरिक विशेषतः मुस्लिम बांधवांचा मोहरम चा उपवासाचा महिना असल्याने व पाण्याची टंचाई अचानक निर्माण झाल्याने नागरिक पाण्यासाठी मौलाली नगर येथिल जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्यासाठी गेले असता तेथिल नगरपरिषद कर्मचारी व त्यांच्या मध्ये तंटा निर्माण होवून तणाव निर्माण झाला होता.

ही बातमी यूवा नेते शंभूराजे यांना काही नागरिकांनी कळविल्या नंतर शंभूराजे तात्काळ तेथे पोहोचले . त्यांनी सर्व प्रथम जेऊर येथिल एम .एस . ई .बी . च्या एक्झूकेटीव इंजिनीयर शी संपर्क करून दहिगाव येथिल पंप हाऊस मधिल तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती केली.

हेही वाचा – केम-रोपळे रस्त्यांची दुरावस्था; १५ ऑगस्टपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास स्वातंत्र्य दिनी शिवसेना महिला आघाडी करणार करमाळा

करमाळा एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना सहन करावा लागतो वाढता मनस्ताप

सुरळीत पाणी पुरवठा होई पर्यंत पाण्याचे टँकर पुरवून नागरिकांची गैरसोय दूर करून होणारा भांडण -तंटा रोखला व पाणी पुरवठा सुरळीत करून घेतला. तसेच त्यांनी न . प . कर्मचारी व पाण्यासाठी आलेले मुस्लिम बांधव यांना समजावून सांगितले व त्यांची समजूत घालुन परस्परांचे गैरसमज दूर केले.

त्यामुळे शंभूराजे यांनी केलेली ही मध्यस्थी तणाव कमी करणे कामी यशस्वी झाली . त्यामूळे त्यांचे शहरवासियांकडून कौतूक होत आहे .

litsbros

Comment here