माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

अंजनगाव खेलोबा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न श्री खेलोबा विद्यालय व जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अंजनगाव खेलोबा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न

श्री खेलोबा विद्यालय व जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

माढा प्रतिनिधी –
माढा तालुक्यातीलअंजनगाव खेलोबा येथील श्री. खेलोबा विद्यालय अंजनगाव (खे.) व जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री. खेलोबा विद्यालय अंजनगाव (खे.) येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थांना मार्गदर्शन कार्यक्रम, विविध परिक्षा उत्तीर्ण व विविध पदावर निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संगिता बिच्चे ( मुख्याध्यापिका, श्री. खिलोबा विद्यालय अंजनगाव (खे.) या होत्या.

सदरील कार्यक्रमामध्ये रत्नदीप शैलेश साठे याची एम.बी.बी.एस साठी निवड झाल्याबद्दल व सारीका हरीचंद्र इंगळे (प्राचार्या, डी.एड कॉलेज माढा) एम. ए. एड,एम. ए. भूगोल, हिंदी व मराठी व पी.एच.डी.आणि शिक्षणशास्त्र मध्ये सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व सुलभा रामचंद्र इंगळे (प्राध्यापिका, महीला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कुर्डूवाडी) शिक्षणशास्त्र या विषयामध्ये मध्ये पी.एच.डी. मिळविल्याबद्दल तसेच चौगुले रविद्र यशवंत (महाराष्ट्र पोलीस, ठाणे) व निकीता कोळेकर (महाराष्ट्र पोलीस, मुंबई) निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याचबरोबर इयत्ता दहावीमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थीनी प्राची बिरूदेव वाघमोडे -८७.८०% अमृता अशोक जाधव-८७.४०%सानिका दादासाहेब वाघमोडे-८६.४०% यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

जि.प.प्र.शाळा परंडाचे मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे व प्राचार्य, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, माढा चे हरिचंद्र इंगळे व निवृत्त शिक्षक धनाजी पाटील गुरूजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमामध्ये रत्नदीप साठे यांनी नीट या मेडीकल प्रवेशाच्या परिक्षेची तयारी कशी करावयाची याची माहीती दिली.तसेच चौगुले रविद्र यशवंत यांनी पोलीस भरतीची तयारी कशी करावयाची व भरतीतील करीअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले.तसेच निकीता कोळेकर यांनी सातत्याने सराव केल्यास खात्रीशीर भरतीच्या संधी आहेत, असे सांगितले.

प्राध्यापिका सुलभा इंगळे यांनी जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल सखोल अभ्यासाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्राध्यापिका सारिका इंगळे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. जीवनात यशस्वी होणाकरिता कठोर परिश्रम आवश्यक असल्याची माहिती दिली.तसेच त्यांनी व्यवसायाच्या विविध संधीची माहीती दिली.

हेह वाचा – आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्यावे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी

करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर

या कार्यक्रमासाठी अंजनगावचे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कोळेकर, प्रदिप चौगुले, उत्रेश्वर पाटील, शैलेश साठे,पप्पू पाटील व गावातील नागरीक व भरतीची तयारी करणारे तरूण तरूणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास लटके क्रीडा अधिकारी उस्मानाबाद यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर काळे विनोद सर यांनी केले तर आभार कसबे सर यांनी व्यक्त केले.

litsbros

Comment here