करमाळा

आजारी आजोबांना भेटण्यासाठी पुण्याहून करमाळयाला येताना अपघात; जखमी तरुणाचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आजारी आजोबांना भेटण्यासाठी पुण्याहून करमाळयाला येताना अपघात; जखमी तरुणाचे निधन

पुणे(प्रतिनिधी); करमाळा येथे राहणाऱ्या आपल्या आजारी आजोबांना भेटण्यासाठी पुण्यातील मांजरी येथून मोटारसायकलवर निघालेल्या तरुणाचा वाटेत दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला त्याला लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले त्यानंतर त्याचा बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मूळ करमाळा येथील भीम नगर मधील रहिवासी असलेला सुरज संजय कांबळे (वय 28) हा मांजरी येथील गोपाळपट्टी भागात राहत होता. आजारी आजोबांना भेटण्यासाठी तो करमाळयाला निघालेला होता.

कुरकुंभ येथील सीएनजी पंपा समोर असणाऱ्या स्पीड ब्रेकर वरून गाडी घसरल्याने त्याच्या डोक्याला जबर इजा झाली होती. त्याचे वर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारासाठी मोठा खर्च येणार होता. हातावर पोट असणारे कांबळे कुटुंबातील हा तरुण उदरिर्वाहासाठी पुण्यात आलेला होता. या घडलेल्या आकस्मिक घटनेने करमाळा येथील कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आजारी आजोबांचे ही निधन

ज्या हजारे आजोबांना भेटण्यासाठी सुरज पुण्याहून करमाळ्याला निघाला होता ते ज्ञानदेव कांबळे यांचेही रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले व अपघातात जखमी झालेल्या सुरतचेही बुधवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

litsbros

Comment here