क्राइमपुणेमहाराष्ट्र

दुर्दैवी! अपघातात अख्या कुटुंबाचा अंत, 4 वर्षाच्या चिमुकलिनेही सोडले प्राण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी! अपघातात अख्या कुटुंबाचा अंत, 4 वर्षाच्या चिमुकलिनेही सोडले प्राण

पुणे- नगर रस्त्यावर कारेगाव ता. शिरूरजवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजुने मोटार आदळुन झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. मृतांत ४ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. काल दुपारी बाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

सुदाम शंकर भोंडवे(वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे(वय ६०), कार्तिकी(वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे(वय ४ जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.अश्विन सुदाम भोंडवे हे या अपघातात जखमी झाले. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रूग्णालयात उपचार चालु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते कुंटुबासह इंडिका गाडीतुन चाकणकडे चालले होते.

दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली गाडी बाहेर काढली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतुक सुरळीत झाली.

मोटारीचा झाला चक्काचूर

अपघातात मोटारीचा चक्काचुर झाला, तर मोटारीत अडकुन सुदाम भोंडवे, सिंधुताई आणि आनंदी यांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नेताना वाटेतच त्यांनी जीव सोडला. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

litsbros

Comment here