सोलापूर जिल्हा

तुळजापूरला जाताना भाविकांच्या गाडीला अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तुळजापूरला जाताना भाविकांच्या गाडीला अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. मोहोळजवळील यावली गावाजवळ मालट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातून तुळजापूरकडे जाताना भाविकांच्या गाडीला मोहोळजवळील यावली गावात अपघात झाला आहे. भरधाव कार मालट्रकवर पाठीमागून आदळली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. कारमधील 3 महिला भाविकांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर एका महिला भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात मृत झालेल्यांची नावे

– आदम अली शेख, चालक ( वय 37)

– हिराबाई रामदास पवार (वय 75)

– कमलाबाई मारुती वेताळ (वय 60)

– द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय 40)

 

जखमीची नावे :

– बाई बाबू पवार (27वर्षे)

– छकुली भीमा पवार (वय 27)

– सई योगीराज पवार (वय 7 वर्ष)

– मंदाबाई नाथा पवार (वय 52 वर्ष )

– सुरेखा भारत पवार (वय 45)

– बायजाबाई रामदास पवार (वय 60 वर्ष )

litsbros

Comment here