केत्तूर परिसरातील नागरिकांनी घेतला ” छावा ” या या ऐतिहासिक चित्रपटाचा आनंद
केत्तूर (अभय माने) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित मराठी चित्रपट ” छावा ” ची सगळीकडे चर्चा असून, शहरात सध्या हा चित्रपट हाऊसफुल चालू आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिविशेष सर्वांना कळावे या उद्देशाने शिवजयंती उत्सव समिती केत्तूर 2 (ता.करमाळा) यांच्या वतीने सोमवार (ता.3) रोजी ठीक 8 वाजता भैरवनाथ चौक परिसरातील भव्य पटांगणात मोफत शो दाखवण्यात आला.
हेही वाचा – हुश्श इंग्रजी विषयाचा पेपर संपला पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिलावर्ग व तरुणांनी या चित्रपटाचा आनंद घेतला.
चित्रपटाचा आनंद शांततेत घेता यावा यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू सर्वांना हळहळ लावून गेला.