मी नारायण आबांच्याच गटात, जेऊरचे उपसरपंचांची भूमिका; आ.शिंदे गटात प्रवेशाच्या वृत्ताबाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण
करमाळा (प्रतिनिधी); मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून आमदार संजय शिंदे यांच्याशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही असे जेऊरचे विद्यमान उपसरपंच अंगद गोडसे यांनी सांगितले.
जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक चालू असून उपसरपंच अंगद गोडसे यांनी विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु आज स्वतः अंगद गोडसे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे भेट घेतली व कालची घटना कशी झाली हे सांगीतले.
याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना अंगद गोडसे यांनी सांगितले की मी काल माझ्या वैयक्तिक कामासाठी टेंभुर्णी येथे गेलो असता परत गावी येत असताना शेलगाव (वा) चौकात जेऊर येथील नागरीक थांबले असल्याचे दिसून आले.
मी उपसरपंच असल्याने काही अडचण असेल ते पहावे म्हणून तेथे थांबलो असता तेथे विद्यमान आमदार संजय शिंदे आले व त्यांनी माझ्याशी कसलीही चर्चा नाही करता थेट माझा सत्कार केला व प्रसिध्दी माध्यमांना मी त्यांच्या गटात प्रवेश केला असल्याचे सांगितले.
वास्तविक पाहता मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असतानाही जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक पाहून आमदार शिंदे गटाकडून जर माझ्यासारख्या जबाबदार पदाधिकारी बाबत अशी फसवणूक करून गट प्रवेश झाल्याचे सांगीतले जात असेल तर सर्वसामान्य जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्यास विद्यमान आमदार संजय शिंदे व त्यांचे जेऊर येथील समर्थक जराही कचरत नसतील. यावरून आता आमदार शिंदे गट जनतेसमोर उघडा पडला असून असे दिशाभुल करणारे राजकारण जेऊर ग्रामस्थ तरी खपवून घेणार नाहीत.
गेल्या चार वर्षांत विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी जेऊर साठी एक रुपयाचा निधी दिला नाही. याउलट आपल्या समर्थकाना पुढे घालून जेऊर गावाला सतत बदनाम करण्याचे काम केले अशा आमदार शिंदे गटास मी भीक घालत नाहीं.
मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून त्यांनी जेऊर सारख्या मोठ्या शहराच्या उपसरपंच पदावर राहून काम करण्याची संधी मला दिलीं.
चालू निवडणुकीत सुद्धा माजी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचे सरपंच पदासह सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार अशी खात्री उपसरपंच अंगद गोडसे यांनी बोलून दाखवली.
मी माजी आमदार नारायणा आबा पाटील यांचा समर्थक, आमदार संजय शिंदे यांचा माझा कसलाही संबंध नाही उपसरपंच अंगद गोडसे यांचा खुलासा.
Add Comment