बागल विद्यालय कुंभेज येथे विश्व हस्तप्रक्षालन दिन साजरा
केत्तूर(अभय माने); अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा संसर्ग होतो. बहुसंख्य आजार हातांची स्वच्छता न राखल्याने होतात. परिणामी आरोग्य धोक्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्या बाबत जाणीव जागृती निर्माण करणे व स्वच्छता विषयक आरोग्यपूर्ण सवयींतून वर्तन बदल व्हावा ही अपेक्षा असते. याच जाणिवेतून दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस विश्व हस्त प्रक्षालन दिन ‘ अर्थात जागतिक हात धुवा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो.
यावर्षी रविवार साप्ताहिक सुट्टीमुळे मुख्य कार्यकारी सोलापूर यांचे आदेशान्वये हा उपक्रम सोमवार (ता.16) ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक हनुमंत पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली कुंभेज येथे दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक कल्याणराव साळुंके , सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ , दादा जाधव यांनी विद्यार्थ्यांना हातांची स्वच्छता व आरोग्याबाबत दक्षता यासाठी क्लीन हॅन्ड्स फॉर ऑल ‘ ह्या थीम नुसार महत्व विषद केले. पाच प्रकारे हातांची स्वच्छता कशी करावी हे प्रात्यक्षिकांसह करून दाखविले. सर्वांनी यापुढे नेहमी हात स्वच्छ ठेवण्याचा व आरोग्यपूर्ण सवयी अंगीकारण्याचा निर्धार व्यक्त केला .
हातांची स्वच्छता व आरोग्य यांचा अत्यंत निकटचा संबंध असून हात स्वच्छ न धुतल्याने विविध संसर्ग होऊ शकतात त्यामुळे विविध आजारांना हे आमंत्रणच मिळते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊन शैक्षणिक नुकसान होते. या बाबी ध्यानात घेऊन आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सातत्याने वैयक्तिक व सार्वजनीक आरोग्य विषयक उपक्रम राबवले जात आहेत.
हनुमंत पाटील मुख्याध्यापकांचे विशेष महत्वाचे या उपक्रमासाठी विद्यालयातील इयत्ता 10 वीमधील समृद्धी भागवत पवार विद्यार्थिनीने हॅन्डवॉश पॅक भेट म्हणून दिला. याबद्दल मुख्याध्यापक पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.
सदर उपक्रमास सेवक , किशोर कदम, बलभीम वाघमारे, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे यांनी सहकार्य केले.
छायाचित्र- कुंभेज : हाताची स्वच्छता करताना विद्यार्थी विद्यार्थी वर्ग
Add Comment