आशिया खंडात विक्रम करणाऱ्या सईचा नारायण पाटील यांचे हस्ते सत्कार
करमाळा (प्रतिनिधी): रोपळे ता. माढा येथील कु. सई शरद बनकर हिने स्केटिंग डान्स स्पर्धेत सलग पाच तास डान्स करण्याचे रेकॉर्ड स्थापित केले आहे. आशिया खंडात सलगपणे पाच तास स्केटिंग करत असताना डान्स करण्याचा हा पहिलाच विक्रम असून या विक्रमाची वरिष्ठ पातळीवरील स्केटिंग खेळाशी संबंधित क्रीडा संघटनांनी नोंद घेतली आहे. कुमारी सई हीचे वय अवघे दहा वर्षे इतके असून ती इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. अगदी लहान वयात तिने केलेल्या विक्रमी कामगिरी बाबत करमाळा मतदार संघाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी तिचा जेऊर ता करमाळा येथे सत्कार केला.
यावेळी रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब गोडगे, शरद पाटील,अतुल दास, अशोक बनकर, अरुण मेहेर, श्रीमती धनश्री बनकर आदी उपस्थित होते. कुमारी सई हिने माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले असून तिचे यश उल्लेखनीय आहे. माजी आमदार नारायण पाटील हे स्वतः एक राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त केलेले नामांकित कुस्तीगीर असल्याने त्यांनी सतत खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.
कुमारी सई हिने जागतिक पातळीवर विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी माजी आमदार नारायण पाटील गट तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
Add Comment