मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या 6 सप्टेंबर रोजी करमाळयात निघणार निषेध महामोर्चा; क्लिक करून वाचा सविस्तर
करमाळा (प्रतिनिधी); येत्या दिनांक 6 सप्टेंबर बुधवार रोजी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने काढण्यात आलेल्या महा निषेध रॅली मोर्चाची पूर्णतः तयारी झाली असून या महा निषेध रॅलीमध्ये अनेक समाज बांधवांनी सदरच्या निषेध मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने ६ सप्टेंबर 2023 वार बुधवार रोजी विराट निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे त्या मोर्चाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे व पाठिंबाही मिळत आहे .
या मोर्चासाठी करमाळा तालुका बारअसोसिएशन(वकील संघ), सकल मुस्लिम समाज करमाळा ,करमाळा व्यापारी असोसिएशन करमाळा , लोकप्रतिनिधी मधून करमाळा तालुक्याचे माजी आमदार श्री जयवंतराव नामदेवराव जगताप यांनी या मोर्चास उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे .
वरील सर्व बांधवांनी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांस जो विश्वासहारतेने पाठिंबा दिला आहे त्याच विश्वासाला पात्र होऊन मराठा क्रांती मोर्चा न्याय व हक्कासाठी लढत आहे लढणार आहे व लढत आलेला आहे त्यामुळे तर विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व व्यापारी अशा अन्य घटकांनी बिनशर्त पाठिंबा देऊन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे उघडपणे जाहीर केले आहे .
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज हा व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करणारा घटक आहे हा घटक मराठा हा शब्द फार व्यापक दृष्ट्या वापरतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मराठा मानला आहे तोच मराठा आम्ही मानतो असे स्पष्ट मत मराठा क्रांती मोर्चा चे आहे .
मग मराठा नेमका कोण या महाराष्ट्रामध्ये जो अठरापगड जातींचा बहुजन बांधव राहतो तोच मराठा आहे या अठरापगड जातीमध्ये कोणावरही अन्याय झाला असेल तर करमाळा तालुक्यामध्ये इतिहास आहे.
प्रत्येक जाती धर्मासाठी मराठा क्रांती मोर्चा सहभागी होऊन सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्याची भावना ठेवतो हे वास्तव आणि सत्य आहे . म्हणूनच तर सहा सप्टेंबर वार बुधवार रोजी निघणाऱ्या मोर्चास जाहीरपणे अनेक जाती धर्मातील समाज बांधव उघडपणे पाठिंबा दर्शवत आहेत.
सदर मोर्चा मध्ये करमाळा शहर तालुक्यातील सकल मराठा समाजासहित इतर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सध्याच्या शासनाला जाब विचारून त्यांचा निषेध करण्याकामी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केली आहे.
Add Comment