करमाळासोलापूर जिल्हा

पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत; मोदी आवास योजनेच्या ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत; मोदी आवास योजनेच्या ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

करमाळा(प्रतिनिधी); पोथरे (ता. करमाळा) येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे भव्य थाटात स्वागत काल(दि.३०)करण्यात आले.यावेळी led स्क्रिनवर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली.

यामध्ये शेती,आरोग्य महिला,शेतकरी यासोबत समाजातील सर्व घटकांसाठी सुरु असलेल्या योजनाची माहिती देण्यात आली तसेच प्रत्येक व्यक्तीला सन २०२४ चे कॅलेंडर व सरकारी योजनाचे माहितीपत्रक देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचातीच्या वतीने ९ लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेच्या घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले.यावेळी प्रशासनातर्फे ग्रामसेवक दरवडे,पो.पाटील समाधान शिंदे,तलाठी कार्यालयातर्फे रवी जाधव,शांतीलाल जाधव,

उमेद बचत गटाच्या महिला माया शिंदे, नूतन शिंदे, प्रियांका शिंदे,उषा आढाव,मनीषा झिंजाडे, राणी झिंजाडे,संगीता पाटील,मीरा झिंजाडे, मंगल झिंजाडे, जाई पुराणे,आरोग्य सेविका सुवर्णा शिंदे,दीपा दळवी,मंगल जाधव, रंजना ठोंबरे,पोस्टमन गणेश ढवळे याचबरोबर भाजपचे नितीनभाऊ झिंजाडे,पोथरे माजी सरपंच विष्णू रंदवे,भाजपा जि.कार्यकारिणी सदस्य, विद्यमान ग्रा.सदस्य विठ्ठल (भाऊ) शिंदे,ग्रा.सदस्य प्र.शांतीलाल झिंजाडे, रासपचे अंगद देवकते,गणेश वाळुंजकर,अप्पा खटके,तात्या झिंजाडे,आत्माराम झिंजाडे,दादा झिंजाडे,मधुकर कडू,यासह शेकडो नागरिक,महिला उपस्थित होते.

हेही वाचा – सोमनाथ ओहोळ लिहितात.. ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक म्हणजे सर्वांना, सर्वांचे बाबासाहेब सांगणारे पुस्तक

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

सेच या कार्यक्रमासाठी उशीरा भाजपचे जि.सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे,बिटरगावचे सरपंच अभिजित मुरूमकर,करंजे गावचे सरपंच काकासाहेब सरडे,झरे येथील ग्रा. सदस्य सोमनाथ घाडगे,नानासाहेब अनारसे, महादेव गोसावी यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथास भेट दिली.

litsbros

Comment here