करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

गणेश चिवटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; करमाळा तालुक्यातील ‘हे’ प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गणेश चिवटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; करमाळा तालुक्यातील ‘हे’ प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

करमाळा(प्रतिनिधी); भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली व
करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निवेदन दिले.

या निवेदनात चिवटे यांनी मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसह, करमाळा तालुक्यातील MIDC ला निधी मंजूर करून तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी तसेच कुकडी, दहिगाव योजना इत्यादी मुद्दे त्यांनी मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवत लवकर हि कामे मार्गी लाऊ असे आश्वासन दिले. अशी माहिती सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.

हेही वाचा – अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले यंदाच्या शासकीय पूजाचे मानाचे वारकरी;मुख्यमंत्र्यांनी केली सपत्नीक शासकीय पूजा

कोरोनात छत्र हरपलेल्या बालकांना जगदीशब्द फाऊंडेशनचा आधार; सलग तिसऱ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

आपण कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.यावेळी करमाळा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

litsbros

Comment here