करमाळामनोरंजन

नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदूक बिरयाणी’ ने दोन दिवसात जमावाला ‘इतका’ गल्ला! प्रेक्षकांना पार्ट 2 ची उत्सुकता..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदूक बिरयाणी’ ने दोन दिवसात जमावाला ‘इतका’ गल्ला! प्रेक्षकांना पार्ट 2 ची उत्सुकता..

दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांचा “घर बंदूक बिरयानी” हा बहुचर्चित मराठी चित्रपट शुक्रवारी ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पुण्यातील चित्रपट गृहाबाहेर नागराज मंजुळे यांनी कलाकारांना सोबत घेऊन हलगी वाजवत हा आनंदाचा क्षण साजरा केला. हेमंत अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नागराज मंजुळे यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजूळे, सयाजी शिंदे अशी बरीचशी कलाकार मंडळी झळकली आहेत. भली मोठी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचे प्रमोशन गेल्या महिनाभरापासून दणक्यात सुरू होते. हा चित्रपट बनवण्यासाठी नागराज मंजुळे यांना ८ कोटींचा खर्च आला होता.

चित्रपटाचे प्रमोशन त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करावे लागले होते. चित्रपटानिमित्त वेगवेगळ्या मंचावर नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांना आमंत्रण दिले गेले. तिथे विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलते देखील झाले. त्यामुळे एकंदरीतच चित्रपटाचे प्रमोशन म्हणावे तसे जोरदार करण्यात आलेले पाहायला मिळाले. घर बंदूक बिरयानी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून तुम्हाला बघायला नक्की आवडेल असा दावा नागराज मंजुळे यांनी केला होता. त्याप्रमाणे दोन दिवसात चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केलेली पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. या दिवशी तिकीटबारीवर ५० लाखांची कमाई केली. तर शनिवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार चित्रपटाने २९ लाखांची कमाई केलेली पाहायला मिळाली.

दरम्यान या दोन दिवसात चित्रपटाने ७९ लाखांची कमाई केली असल्याने चित्रपट झालेला खर्च काही दिवसातच भरून काढेल अशी खात्री वाटते. शनिवारी आणि रविवारी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असतात त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. उद्या रविवारी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत नागराज मंजुळे यांचं आणि दिग्दर्शक हेमंत अवताडे यांचं कौतुक केलं आहे. चित्रपटात कॉमेडी, सस्पेन्स आणि ऍक्शन सिन असल्यामुळे कथानक प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवण्यास यशस्वी झाले आहे. तर चित्रपटाच्या शेवटी आमदार कोण? हा सस्पेन्स राखून ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटाचा पार्ट टू येणार याचे संकेत मिळालेले आहेत. आता घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या सिक्वलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

litsbros

Comment here