सोलापूर जिल्हा

उजनीतून  सोडलेले पाणी सोलापूरपर्यंत पोहोचायला लागणार तब्बल 10 दिवस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीतून  सोडलेले पाणी सोलापूरपर्यंत पोहोचायला लागणार तब्बल 10 दिवस

पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा शहरांसाठी उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावला असून आज सकाळी 10 वाजता धरणापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगम येथे पोचायला पाण्याला 41 तासांचा वेळ लागला आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून पाच हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती . सर्वसाधारणपणे धरणातून सोडलेले पाणी इतरवेल तासाला एक किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असते . मात्र गेल्या काही दिवसापासून कोरडे पडलेले पात्र , पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मशीनच्या साहाय्याने नदीत खोदलेले मोठा मोठे खड्डे भारत पाणी पुढे सरकताना साधारण तासाला अर्धा ते पाऊण किलोमीटर असा संथ गतीने प्रवास करत पुढे सरकत आहे.

उजनी धरणापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे 33 तासानंतर पाणी पोहचले असले तरी यापुढचा प्रवास मंदावत चालला आहे . नरसिंहपूरपासून संगमपर्यंतचे पाच किलोमीटर अंतर कापायला आठ तासांचा वेळ लागला आहे . यापुढे सर्व शेतीचे क्षेत्र असल्याने नदीतून पाणी पुढे सरकायला अजून वेळ वाढत जाणार आहे . सध्या प्रशासनाने पिण्यासाठी सोडलेल्या या पाण्याचा उपसा करू नये म्हणून भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील वीज प्रवाह खंडित केला आहे . उजनी धारण ते पंढरपूर हे अंतर 115 किलोमीटर असून येथे पाणी पोहचायला चार किंवा पाच दिवसांचा वेळ लागणार असून सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पाणी पोहचायला तब्बल 10 दिवसांचा वेळ लागेल.

सध्या भीमा नदी कोरडी असल्याने उजनी धरणातून पिण्यासाठी सोडलेले पाणी पंढरपूरला पोचायला चार दिवस तर सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पोचण्यास आठ दिवसाचा वेळ लागणार आहे . या दरम्यान पाण्याचा शेतीसाठी पाणी उपसा होऊ नये म्हणून भीमा नदीकाठच्या दोन्ही काठावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे पाणी वेळेत पंढरपूर आणि सोलापूरपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. पंढरपूर आणि सांगोला नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे बंधारे आहेत . याशिवाय सांगोल्यातील 81 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना आणि कासेगाव पाणी पुरवठा योजनेचाही बंधारे आहेत.

पंढरपूरवरून पाणी पुढे जाताना मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा असून यानंतर सोलापूर महापालिकेचा औज बंधारा आहे . हे पाणी सोलापूरला जाताना रस्त्यातील बंधारे भरून घेतले जाणार आहेत . यामुळे पुढील दोन महिने या शहरांची तहान मागण्यास मदत होणार आहे . सध्या उजनी धरणात 22.90 टक्के इतका पाणीसाठा असून धरणात 75 टीएमसी पाणी आहे . पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर धरणाची पातळी अजून खालावणार असून शेतीसाठी एक पाळी पाणी सोडण्यास मात्र शासनाने नकार दिला आहे .

litsbros

Comment here