उजनी जलाशयावर आढळला दुर्मिळ पानकोंबडा
केत्तूर (अभय माने): आत्तापर्यंत आपण पाळीव कोंबडे ऐकले असतील पाहिले असतील पण आता उजनी धरणामध्ये प्रथमच पानकोंबडा आढळून आला आहे. हा पान कोंबडा भारताच्या हिमालयापासून ते पाकिस्तान, बांगलादेश,अंदमान, निकोबार बेट, मालदीव,श्रीलंका आदी देशामध्ये आढळून येतो.
उजनी जलाशयात शेकडो जातीचे विविध पक्षी देश-विदेशातून स्थलांतर करून विणीच्या हंगामासाठी हजारो किलोमीटराचा प्रवास करून येत असतात.
उन्हाळ्यापासून ते पावसाळ्याच्या तोंडापर्यंत त्यांची रेलचेल असते. यामध्ये अग्निपंख, राखी बगळा, चित्रबलाक, राखी बगळा,तुतारी,पट्ट कदंब आदी पक्षांचा समावेश आहे.अगदी रेड डाटा पुस्तकांमध्ये अति दुर्मिळ पक्षांचाही यामध्ये समावेश असतो.
यापैकीच एक आता पान कोंबडा प्रथमच पक्षप्रेमी व पर्यटकांना भिगवण भागातील उजनी धरण क्षेत्रात कुंभारगाव भागात आढळून आला आहे.या पान कोंबड्याला केमकुकडी किंवा टुमटुम या नावाने ओळखले जाते.
आकाराने गाव तीतारीपेक्षा हा पक्षी मोठा असतो, तांबडी चोच, कपाळावर लहान त्रिकोणी आकाराचे पिवळट सिंगासारखे कवच, शेपटी खालील भाग पिवळसर,तांबडे पाय तपकिरी,काळ्या अशा रंगात तो दिसतो त्याचप्रमाणे तपकिरी गर्द व रुंद रेषाही पट्टेदारपणे त्याच्यावर दिसतात अगदी पाळीव कोंबड्या प्रमाणे हा पक्षी दिसतो.
या पक्षाचे निरीक्षण कुंभारगाव येथील पक्षीप्रेमी उमेश सल्ले यांनी नुकतेच केले आहे.उजनीत पाहिल्यानंदच तो आढळल्याचे सल्ले यांनी सांगितले.
Comment here