करमाळामाढासोलापूर जिल्हा

उजनीचे पाणी संपले मासेही संपले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीचे पाणी संपले मासेही संपले

केत्तूर ( अभय माने) उन्हाळा सुरू झाला सूर्य आग ओकत आहे. त्यातच उजनीची पाणी पातळी वजा 20 टक्केवर जाऊन पोहोचली आहे. पाणीसाठा वरचेवर कमी होत असल्याने उजनी जलाशयातील (गोड्या पाण्यातील) माशांची आवक मोठ्या प्रमानात कमी होऊन मागणी मात्र जास्त असल्याने भिगवण व इंदापूर मच्छी मार्केटमध्ये माशांचे दर मात्र कमालीचे वाढू लागले आहेत.त्यामुळे मांसाहारप्रेमींना आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

उजनी धरण परिसरात दरवर्षी पाणीसाठा कमी होताच वडाप व पंडी जाळी टाकून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात होती.मात्र गेली दोन अडीच महिन्यांपूर्वी शासनाने पहिल्यादाच उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात रोहू, कटला, मृगल या जातीचे मासे सोडून उजनीतील मत्स्यसंपदा वाढवून पाणीप्रदूषण कमी करण्याचा व दुसऱ्या बाजूने मच्छिमारांचा मत्स्यउद्योग वाढविण्याचा अतिशय चांगला आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे.यामुळे नुकतेच सोडलेल्या शासकीय लहान मासळी वाचवण्यासाठी उजनीतील सर्व वडाप व लहान मासे मारणार्यावर्ती प्रतिबंध घालण्यात आला आहे.त्यातच बदलत्या वातावरणामुळे मासळीची आवक घटल्यामुळे लिलाव काट्यावरील मासळीचे बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत.

हेही वाचा – वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

माशाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे —–

लहान चिलापी 60 ते 80, मोठी चिलापी 70 ते 110, रहू 200 ते 250 ,कटला 200 ते 240,मरळ 360 ते 400 ,वाम 500 ते 550 रुपये किलो असे झाले आहेत.

” सध्या माशांना मागणी वाढली आहे परंतु दिवसभर पाण्यात राहूनही मासेच सापडत नसल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
– हनुमंत कनिचे, सोमनाथ कनिचे मच्छीमार, केत्तूर (ता.करमाळा)

litsbros