करमाळा

उजनीच्या पाणीसाठ्यात धिम्यागतीने वाढ, टेन्शन मात्र वाढले; मागील वर्षी झाले होते 104% आज मात्र आहे फक्त..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीच्या पाणीसाठ्यात धिम्यागतीने वाढ, टेन्शन मात्र वाढले; मागील वर्षी झाले होते 104% आज मात्र आहे फक्त..

केत्तूर (अभय माने ) ऑगस्ट महिना कोरडाठाक गेल्यानंतर सप्टेंबर मध्येही मान्सूनची स्थिती मजबूत नसल्यामुळे राज्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिला आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी मिळाली आहे.सध्या शेतातील उभ्या पिकांना हलक्या पावसाची गरज आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास मात्र महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

उजनी धरणाचा पाणीसाठा पावसाळा संपत आल्यावरही फक्त 17.11 टक्केवरच आला आहे गतवर्षी तो 104% टक्केच्या पुढे होता. असे असताना सोलापूरसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी जोर वाढत आहे त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत त्यामुळे या धरणातून उजनी धरणात पाणी सोडावे अशीही मागणी होत आहे.परंतु सध्याची पावसाची परिस्थिती पाहता याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्याची परिस्थिती मात्र धरण उशाला अन् कोरड पिकांना. .. अशी परिस्थिती झाली आहे. पाऊस नसल्यामुळे विहिरी तसेच विंधन विहिरी यांचे पाणी आटले आहे त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाने ओढ दिल्यास पिकांचे उत्पादन घटणार आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने उभ्या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. ऑगस्ट महिना कोरडाठाक गेल्यानंतर सप्टेंबर मध्ये काय होणार ? याची उत्सुकता शेतकऱ्यांचे नागरिकांना लागून राहिली आहे. आता यापुढे पाऊस झाला तरी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही अशीच मानसिकता मात्र उजनी लाभक्षेत्रात तयार झाली आहे.

छायाचित्र — उजनी धरण (संग्रहीत)

litsbros

Comment here