तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे घवघवीत यश
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालय चा कुमार शिवराज नितीन टागंडे या विद्यार्थ्यांने ११०कि,वजन गटामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रिडा शिक्षक बेरे एस,यू यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रावण महिन्यात एसटीने करा माफक दरात देवदर्शन; एस टी महामंडळाचा अभिनव उपक्रम वाचा सविस्तर
त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण वळेकर मुख्याध्यापक श्री व्यवहारे,एस,जे व सर्व शिक्षक शिक्षकेतर यानी अभिनंदन केले आहे त्याचे जेऊर परिसरातून कौतुक केले जात आहे.
Comment here