क्राइम

एकुलत्या एका मुलाने जीवन संपवलं, आईनेही केली आत्महत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एकुलत्या एका मुलाने जीवन संपवलं, आईनेही केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एकाच कुटुंबात आधी मुलाने आणि आता आईने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे. पैठण तालुक्यातील शिवनाई गावातील ही घटना असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकुलत्या एक 17 वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र मुलाचा विरह सहन न झाल्याने आईनेही घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. रितेश रमेश काळे (वय 17 वर्षे, रा. शिवनाई, पैठण) असे मुलाचे तर रुखमनबाई रमेश काळे असे आत्महत्या करणाऱ्या आईचे नाव आहे.

पैठण तालुक्यातील शिवनाई येथील अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय शालेय विद्यार्थी रितेश रमेश काळे याने (02 मार्च) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रितेश काळे आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तर रितेशच्या आई रुखमनबाई रमेश काळे यांना आपल्या मुलाचे दुःख सहन न झाल्याने  बुधवारी (22 मार्च)  दुपारी राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमुळे शिवनाई व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. रुखमाई काळे यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, सतीश बोडले, राहुल बल्लाळ, संजय चव्हाण, घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुखमनबाई काळे यांना बिडकीन ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

litsbros

Comment here