माढाशैक्षणिक

दिपाली लंगोटे हिचे एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टेंभुर्णी येथील दिपाली लंगोटे हिचे एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश 

उपळवटे (प्रतिनिधी:  संदीप घोरपडे

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील डी एन लंगोटे यांची कन्या दिपाली लंगोटे हिने एमपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे तालुक्यामधुन तिचे कौतुक होत आहे असे पुण्यनगरी चे पत्रकार धनंजय मोरे यांनी सांगितले आहे एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून (सब रजिस्टर क्लास वन) झाल्याबद्दल तिचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला आहे जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन मधुकर माने यांच्या हस्ते दिपाली लंगोटे यांचा सत्कार करण्यात आला आहे दिपाली हिने एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे त्यामुळे आपल्या लाडक्या मुलीचे अभिनंदन करताना आई वडिलांचे मन गहिवरून आले होते.

यावेळी उपस्थित जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन मधुकर माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे पोपट मोरे सोसायटीचे माजी चेअरमन नागेश मोरे पोपट भरगंडे उद्योजक सतीश हांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

litsbros

Comment here