सातारा पुसेसावळी हिंसाचाराचा करमाळा भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांकडून निषेध
करमाळा(प्रतिनिधी); सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे रविवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा करमाळा येथे भारत मुक्ती मोर्चा कडून निषेध नोंदवत तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदनाची प्रत पोलीस स्टेशन करमाळा यांनाही देण्यात आली.
सदर निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटकांकडून सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करून महापुरुषांचे अपमान करणारे पोस्ट केले जात आहे. परिणामी एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध हिंसाचार केला जात आहे.
असाच प्रकार सातारा येथील पुसेसावळी गावामध्ये घडला असून काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या वस्तीवर हल्ला करून धार्मिक स्थळाची मोडतोड करणे, वाहनांची मोडतोड व जाळपोळ करून अनेक लोकांना जबर मारहाण केली आहे.
ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून काहींची परस्थिती चिंताजनक आहे. सदर घटनेचा निषेध करत यातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करून हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ब्रेकिंग; बंधन बँकेला काही बंधन आहे की नाही? करमाळा शाखेत पुन्हा आर्थिक घोटाळा; ३४ लाखांचा अपहार !
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, आर आर पाटील, भिमराव कांबळे, दिनेश माने, अभिजित बनसोडे, दीपक भोसले, अभिषेक बनसोडे, विनोद हरिहर, मधुकर मिसाळ, रावसाहेब जाधव, बाबुराव पाटील यांच्यासह राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कयूम शेख, कादिर शेख,
जावेद मनेरी, बशीर शेख, अमीर मोमीन, जमियत उलेमाचे मोहसीन शेख, बहुजन विकास संस्थेचे इसाक पठाण यांच्यासह अस्लम शेख, रियाज कुरेशी, समीर शेख, अस्लम नालबंद, बब्बूभाई बेग, इस्राईल शेख, सोहेल मुलाणी, सुलतान पठाण यांच्यासह मोठया संख्येने लोक सहभागी झाले होते.
Comment here