करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात सामाजिक संघटनांनी विविध उपक्रम घेत डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात सामाजिक संघटनांनी विविध उपक्रम घेत डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली

केत्तूर ( अभय माने ) विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त करमाळा येथील बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, अल कुरेश यंग ग्रुप, छत्रपती क्रांती सेना, बहुजन विकास बचत गट आदी समविचारी सामाजिक संघटनांनी शहरात विविध उपक्रम घेत डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

यावेळी या संघटनांकडून सकाळी करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सायंकाळी जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच मिरवणुकीत सामील भीम सैनिकांना पंजाब वस्ताद चौक येथे शरबतचे वाटप करण्यात आले.

यावेळी भिमजयंती उत्सव समितीचे दशरथ कांबळे, नागेश कांबळे, रमेश कांबळे, मुकुंद कांबळे, दीपक ओहोळ, लक्षण भोसले, एड. महादेव कांबळे, जितेश कांबळे, जयकुमार कांबळे, राजू आव्हाड, देवा लोंढे आदी पदाधिकारी यांचे माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, छत्रपती क्रांती सेना संयोजक आर. आर. पाटील, भारत मुक्ती मोर्चा कार्याध्यक्ष कय्युम शेख, बहुजन विकास बचत गटाचे अध्यक्ष जमीर मुलाणी, राजू बागवान, अतिकुल वस्ताद शेख यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी रियाज अहमद कुरेशी, अरबाज कुरेशी, एजाज बिल्डर कुरेशी, रुस्तुम कुरेशी, रियाज कुरेशी, हाजी खाजा हुसेन कुरेशी, वासिम कुरेसी, फैयाज कुरेशी, लाला कुरेशी, बादशहा कुरेशी, शाबाद कुरेशी, सैफाली कुरेशी, इरफान कुरेशी, शाहीर कुरेशी, शाहरुख कुरेशी, ताहेर कुरेशी, रौफ कुरेशी, सलमान कुरेशी, अव्वा कुरेशी, राजू कुरेशी, चांद कुरेशी,

हेही वाचा – करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

चांगली बातमी; अखेर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला भुलतज्ञ मिळाले; रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रियेसाठी सक्षम व्यवस्था; रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

अफजल कुरेशी, मुजम्मील कुरेशी, सद्दाम कुरेशी, सिद्दिक कुरेशी, नजर कुरेशी, मुबीन कुरेशी, शहनवाज कुरेशी, शोएब कुरेशी, बबलू पठाण, मुबीन बागवान, अरुण माने, गौतम खरात, दिनेश माने, विनोद हरिहर, दिनेश दळवी, बाबुराव पाटील, मधुकर मिसाळ, रावसाहेब जाधव यांच्यासह बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, अल कुरेश यंग ग्रुप, छत्रपती क्रांती सेना, बहुजन विकास बचत गट आदी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here