करमाळासोलापूर जिल्हा

सामाजिक एकतेचा संदेश देणारा गणेशोत्सव लोकोत्सव व्हावा; प्रा.रामदास झोळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सामाजिक एकतेचा संदेश देणारा गणेशोत्सव लोकोत्सव व्हावा; प्रा.रामदास झोळ

करमाळा (प्रतिनिधी);
भारतीय स्वातंत्र्यलढा बळकट करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेश उत्सवाची सुरुवात झाली असुन सामाजिक एकतेचा संदेश देणारा गणेश उत्सव लोकोत्सव व्हावा या दृष्टिकोनातून गणेश उत्सवाची सुरुवात केली असुन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.

कोंढारचिंचोली येथील गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती प्रा.रामदास झोळ सर यांच्या हस्ते करण्यात आली. कोंढारचिंचोली गणेश मंडळाच्यावतीने प्रा.रामदास झोळ सर यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की गावाच्या विकासासाठी विधायक सामाजिक उपक्रमास आपण सहकार्य करणार असून ग्रामस्थांना बसण्यासाठी पाच बाकडे देण्याची घोषणा त्यांनी केली.

सामाजिक बांधलिकीच्या भावनेतुन उल्लेखनीय कार्याबद्दल खातगाव येथील जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक बाळासाहेब बोडखे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .
याबरोबर मेजर प्रशांत गंलाडे,घोडके सर सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – खाजगी शिक्षक व नोकर भरतीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अर्धनग्न आंदोलन

सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते संपन्न, करमाळयात घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन

यावेळी सरपंच शरद भोसले,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ साळुंके,रवी खांडेकर,ज्ञानेश्वर गंलाडे,गणेश मंडळाचे अध्यक्ष शरद खांडेकर मंडळाचे कार्यकर्त सोमनाथ खांडेकर,अतिष राऊत, निखिल साळुंके, अनिकेत कांबळे कोंढारचिंचोलीचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here