Uncategorized

दुर्दैवी घटना! सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू, तिघे एकाच घरातील; गावावर शोककळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी घटना! सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू, तिघे एकाच घरातील; गावावर शोककळा

 वाहत्या सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू झाल्याची दुखःद आणि दुर्देवी घटना समोर आली आहे.  बारामती तालुक्यातील खांडज येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली असून मृत झालेले तिघे एकाच कुटूंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

खांडज(ता.बारामती) येथे वाहत्या सांडपाण्याचा चेंबर साफ करताना एकाच कुटुंबातील तिघाजणांसह शेजारील एकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर उपचारासाठी सर्वांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पुर्वीच या सर्वांची प्राणज्योत मालवली.

या दुर्देवी घटनेमध्ये साफ करण्यासाठी एकजण आतमध्ये उतरला होता. मात्र तो टाकीत अडकल्याने त्याच्या मदतीला इतर तिघे गेले आणि त्यांचाही यामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

litsbros

Comment here