करमाळासोलापूर जिल्हा

रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

केत्तूर (अभय माने) पारेवाडी रेल्वे स्टेशन (ता.करमाळा) येथे एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार आणि रेल रोको अटळ असल्याचा इशारा केत्तूर
ग्रामपंचायतीच्या समोर झालेल्या मेळाव्यात देण्यात आला आहे. 2 मार्चपर्यंत गाडी न थांबल्यास 9 मार्चला रेलरोको करण्यात येणार आहे.

केत्तुरसह गोयेगाव, पोमलवाडी, खातगाव, हिंगणी, पारेवाडी, देलवडी येथील सरपंचाचे व व्यापारी, प्रवासी ग्रामस्थांनी यावेळी ग्रामपंचायतचे आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठराव दिले आहेत.

गेल्या 30 वर्षापासून परिसरातील नागरिकांची एक्सप्रेस गाडी थांबवण्याची मागणी आहे.1996 यासाठी रेल रोकोही करण्यात आला होता त्यावेळी निश्चितच गाडी थांबवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आले होते परंतु हे केवळ आश्वासन होते.

त्यानंतरही गाडी थांबली नाही परंतु ग्रामस्थांनी मात्र पाठपुरावा करण्याचे सोडले नाही.याबाबत खासदार सुप्रिया सुळे, शरदचंद्रजी पवार,रणजीतसिंह निंबाळकर, रेल्वेमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या वेळोवेळी मागणी करण्यात आली होती.

रेल्वे स्थानक व रेल्वेच्या इतर पायाभूत विकास कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार (ता.26 ) रोजी सकाळी 10.30 वाजता होणार होता या कार्यक्रमावर पारेवाडीसह परिसरातील ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असे समजताच हा येथील कार्यक्रम रेल्वे प्रशासनाने रद्द केला होता.

हेही वाचा – लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

या कार्यक्रमात गेट क्रमांक 28 च्या भुयारी मार्गाचे उद्घाटन होणार होते परंतु हा भुयारी मार्ग अजूनही व्यवस्थित झालेला नाही याबाबत”सकाळ” नेही वेळोवेळी आवाज उठवला होता.

litsbros