आम्ही साहित्यिकमहाराष्ट्रराज्य

ll याला रहाटगाडगे ऐसे नाव ll

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ll याला रहाटगाडगे ऐसे नाव ll
================
खरंच आपण प्रत्येक जण म्हणजे शेतकऱ्याची पोरं…भली ती पुण्या मुंबई मध्ये बँकेत मॅनेजर…कंपनीत मोठा अधिकारी… नाहीतर दवाखान्यात भले डॉक्टर असेल… कदाचित बांधकामावर मोठा इंजिनिअर पण असेल…पण त्यो एका शेतकऱ्याचा पोरगा आहे पोरगा नाही तर नातू तरी असणार एवढी संपदा आपल्याला लाभलीयं अन शेतकरी म्हणाल तर भले शहरात त्याच्या राहणीमानाप्रमाणे बंगला…गाडी… नोकर… चाकर.. असतील मुला बाळांचं… बायका पोरांचं… आणि त्याचं स्वतंत्र स्वतःच असं राहणीमान सुधारलेलं असेल सकाळचा नाश्ता… दुपार संध्याकाळचं जेवण…भले चमच्यानी …काटे चमच्यानी करीत असेल सुटा बुटात कामावर पण जात असेल पण त्याच्या कुटुंबाचं खरं रूप गावाकडून घरचं कुणीतरी नाहीतर चार जण बाप्पे माणसं आल्यावर कळतं
त्यांच्या राहणीमानानुसार आणि बोलीवरून लगेच कळून येतं कारण शेतकरी राजाचं आयडेंटिफिकेशन त्यानं कधीच लपवून ठेवलेलं नाही शेती म्हटलं की उभं राहतं ग्रामीण जीवन त्याची पहिली पायरी म्हणजे अड्जस्टमेंट…बघा कालवणाला काही नसलं तरी सांच्याला शिवारात एखादा फेरफटका मारला तरी लुगड्याच्या सोग्यात दहा पाच वांगी…मुठभर हिरव्या मिरच्या… माझी शेतकरी माऊली घेऊन येणार म्हणजे येणार आणि कालवण करणार नाहीचं जमलं तर मूठभर बेसनपीठ तांब्याभर पाण्यात हाटून गरम गरम पिठलं करणार 15 मिनिटात पंधरा माणसाचा स्वयंपाक तयार भाकरी तर काय आधीच बडावलेल्या असतात पिठलं भाकरच पण दणकून यालाच शेतकरी राजा म्हणतात


पण एक आठवलं या शेतकऱ्याच्या काही उपाय योजना आता लोप पावत चाललेल्या दिसतात लाकडी अवजाराची जागा लोखंडी सामानाने घेतली… बैलांची कामं ट्रॅक्टर…हार्वेस्टर करतोय तशातच आठवण झाली सहज एका पुस्तकात रहाट गाडग्याचं चित्र बघितलं अन हात वळवळ करायला लागला आणि थोडं लिहावं असं वाटलं कारण आम्हाला खरोखचं शेतीवाडी ही वाडवडिलांपासून नाही नुसतं आपलं डोळ्यांनी बघायचं… अन डोळ्याचं पारणं फेडायचं तर खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे रहाटगाडगे पाहिल्यावर आपल्याला प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ कळतो आणि पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं याला जीवन ऐसे नाव
ही रहाटगाडगं मी जवळून पाहिलयं त्याच्याशी गुजगोष्टी केल्यात तवा कळलं की भावनांना शब्द नसतात खरं बघायला गेलं तर आजच्या पिढीला रहाटगाडगं हा शब्द माहित पण नाही त्यामुळे फक्त योगायोगाने जर डोळ्यासमोर व्हिडिओ आला तर निरखून बघणं एवढचं काय थोडक्यात सांगायचं झालं तर रहाटगाडगे म्हणजे काही ठिकाणी पाय रहाट असतो हा रहाट एक माणूस वरून एका हाताने आपल्या अंगावर ओढून अगोदरच विहिरीच्या कठड्यावर बैठक मांडलेली असते आणि आलेला तो लाकडी खाच्या पायाने रेटा देऊन खाली ढकलायचा तोपर्यंत वरचा दुसरा खाच्या हातात येतो हीच क्रिया वारंवार केली जाते यालाच रहाटगाडगे म्हणायचं
एका लोट्यातलं पाणी रिकामं होतं आणि लगेच दुसऱ्या लोट्यातं भरलं जातं आयुष्याचं पण असंच आहे तर रहाट अन गाडगे यांची मिळून ही यंत्रणा बनते म्हणून तिला रहाटगाडगे असे म्हणतात.

पूर्वी काही ठिकाणी बैल लावून ही रहाटगाडगं फिरवलं जायचं रहाटाच्या मदतीने त्या गोल लाकडी साच्यावर लावलेलं गाडगं त्या रहाटाच्या मदतीने ती गाडग्यांची माळ गोल गोल फिरल अशी बसवलेली असते तर ही गाडगी पाण्यात बुडतात व वर येताना पाण्याने भरलेली असतात रहाटावरून पुन्हा खाली विहिरीत जाताना ही गाडगी उलटी होऊन त्यात भरून आलेले पाणी एका पन्हाळीत पाडलं जातं व पन्हाळीतलं पाणी थारोळ्यातून काढलेल्या चारीद्वारे शेतीला दिलं जातं 

हेही वाचा – सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

थोडक्यात सांगायचं झालं तर रहाट म्हणजे रुंद तोंडाच्या विहिरीतून दोरीला बादली बांधून पुलीच्या मदतीने पाणी वर काढलं जातं ते चाक आणि पूर्वी बागायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी वाडीतील मोठ्या व्यासाच्या विहिरीच्या एका बाजूला मोठा लाकडी किंवा लोखंडी रहाट बसवून लोखंडी डबा किंवा मातीच्या गाडग्यातून ज्याला बांडी म्हणायचे त्याच्याद्वारे पाणी उपसलं जायचं आणि ते दांडाद्वारे किंवा पाटाद्वारे पिकांना पुरवलं जायचं साधारण वीस-बावीस मडक्यांची माळ गोलाकार चक्रावर लावून हा रहाट फिरवला जायचा प्रत्येक मडक्याच्या बुडाला छोटसं छिद्र पाडलेलं असायचं की जेणेकरून चक्राच्या एका बाजूला पाण्याचा जादा भार पडत नसायचा थोडक्यात बघायचं झालं तर भरलेलं रिकाम करायचं आणि रिकामं झालेलं उद्यासाठी म्हंजे भविष्यासाठी पुन्हा भरायचं…भरून ठिवायचं हेच तर जीवनाचं रहाटगाडगं यालाच जीवन ऐसे नाव आहे चराचर सृष्टीचं पण निसर्गाचं एक रहाटगाडगं आहे हे पण एक चक्र आहे एक साखळी आहे
**********************************किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros