आरोग्यमहाराष्ट्र

मिरजेत पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवदान; डॉ रियाज मुजावर यांच्या आधुनिक कौशल्य शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला जिवदान 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मिरजेत पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवदान; डॉ रियाज मुजावर यांच्या आधुनिक कौशल्य शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला जिवदान

करमाळा (प्रतिनिधी); मिरजेत प्रसिद्ध ह्दयरोग तज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी भारती हॉस्पिटलमध्ये एका 75 वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास शस्त्रक्रिया टाळून त्याच्या हदयात IVL या आधुनिक पद्धतीने बलून द्वारे 99 टक्के कॅल्शियमचे ब्लॉकेज वर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले.

विजय शामराव देशपांडे वय 75 रा विश्रामबाग यांच्यावर सन 2015 मध्ये बायपास सर्जरी झाली होती.मात्र मागील काही दिवसांत पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांनी डॉ रियाज मुजावर यांच्या कडे दाखविले. यावेळी डॉ मुजावर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हृदयामध्ये तसेच वायामानानुसार कॅल्शियम जमा झाले होते त्यांच्या हृदयात 99% ब्लॉक आढळून आले.

सदर कॅल्शियमचे ब्लॉक असल्यामुळे व पुन्हा त्यांच्यावर बायपास करणे जोखीम असल्यामुळे डॉक्टर मुजावर यांनी IVL या आधुनिक बलून द्वारे हृदयाच्या नाडीतील कॅल्शियम फोडून अडथळा दूर केला. त्यामुळे त्याच्यावर एन्जोप्लास्टीद्वारे स्टेंथ बसवणे सोपे झाले.

या आधुनिक बलून द्वारे कॅल्शियम फोडल्यामुळे हृदयाच्या नाडीच्या भिंतीला पूर्णपणे चिकट होण्यास मदत झाली. त्यामुळे हृदयाचा मोठा भाग खुला झाला आणि त्यांचा रक्तपुरवठाही सुरळीत झाला एकूणच त्यांचे वय पाहता त्यांच्यावर पुन्हा बायपास करणे जखमीचे असताना बायपास टाळत त् डॉक्टर मुजावर यांनी त्यांच्यावर आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले.

त्यामुळे देशपांडे यांच्या कुटुंबाने डॉ.रियाज मुजावर यांचे आभार मानले.अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी पुणे मुंबई या ठिकाणी नागरिकांना जावे लागत होते मात्र सध्या आता सांगली मिरजेत सुद्धाअशा पद्धतीची आधुनिक शस्त्रक्रिया द्वारे हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे जीव वाचवता येत असल्याचे माहिती डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली.  

Dr Riyaj Umar Mujawar Aryan Heart care Cardiologist in Miraj Sangli Maharashtra –

c/o Manakapure hospital near sortur hospital vantamure corner, Sangli – Miraj Rd, near mirchi hotel, Miraj, Maharashtra 416410

091756 23857.

litsbros

Comment here