माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी
करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील कोर्टी, निलज, पोटेगाव या गावांचा मुख्यमंत्री सडक योजनेत समावेश करून रस्त्याची कामे करण्याची मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे .
१ )मौजे कोर्टी ते कुस्करवाडी
२) मौजे संगोबा ते निलज
३) मौजे पोटेगाव ते तांदुळवाडी जि.उस्मानाबाद सरहद्द
४) करमाळा शहर बायपास रोड ते माळेवाडी जुना निलज रोड या गावांच्या रस्त्यांचा समावेश आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याची कामे होवून दळणवळणाची सुविधा होणे बाबत या भागातील जनतेची फार पूर्वी पासूनची मागणी आहे.
या गावाचा मुख्यमंत्री सडक योजनेत समावेश करून हि गांवे चांगल्या पक्क्या रस्त्यांनी जोडल्यास या भागात दळणवळणाची चांगली सोय होणार असल्याचे माजी आमदार जगताप यांनी पालकमंत्री ना. विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे .
Comment here