शैक्षणिकसोलापूर जिल्हा

मारुती फडके यांची सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मारुती फडके यांची सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

माढा / प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड-पाटील) – माढा तालुक्यातील कुर्डूवाडीचे रहिवासी व सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग येथे सहसचिव म्हणून कार्यरत असणारे मारूती चांगदेव फडके यांची सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्तीचे आदेश मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी काढले आहेत.

लातूर येथे सहसचिव पदावर रुजू होण्यापूर्वी मारुती फडके यांनी कुर्डूवाडी व मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जबाबदारी पार पाडली होती.माढा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले.तंबाखू मुक्त शाळा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले होते.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण अभियान,शंभर टक्के पटनोंदणी उपक्रम राबवून त्यांनी कार्याचा ठसा निर्माण केला होता.

एक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी नव्हते त्यामुळे प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणूनच अनेकांनी कामकाज पाहिले परंतु काही जणांची कारकीर्द खूपच चर्चेत राहिली आहे.आता मारूती फडके यांच्या रुपाने पूर्णवेळ शिक्षणाधिकारी लाभले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे पेंडिंग प्रश्न व समस्या नक्कीच मार्गी लागतील अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ 2 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह या 5 उपकेंद्रांच्या पद निर्मितीला मान्यता; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

अबब! उजनी जलाशयात सापडला चक्क २५ किलोचा मासा

सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी मारुती फडके यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी – नूतन शिक्षणाधिकारी मारुती फडके

litsbros

Comment here