करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा करमाळाकरांच्या वतीने शिवरत्न वर सत्कार; वाचा सविस्तर!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा करमाळाकरांच्या वतीने शिवरत्न वर सत्कार; वाचा सविस्तर!

करमाळा प्रतिनिधी- कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस काल राज्य सरकार ने 3326 कोटी रुपये मंजूर केले .त्यामुळे सहा जिल्हे आणि बत्तीस तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी क्रुष्णा खोर्‍यातून उजनी धरणात येवून पुढे सिना कोळगाव धरण मार्गाने मराठवाडय़ात जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याने धरणासाठी सर्वस्व त्यागणार्या उजनी व कोळगाव धरणग्रस्तासह संपूर्ण करमाळा तालुक्यालाच आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी काल अकलुज येथे शिवरत्न बंगल्यावर बोलताना केले.

क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस सरकारने काल निधी मंजूर केल्यानंतर या योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याच्या वतीने शिवरत्न बंगला,अकलुज येथे करण्यात आला. या वेळी प्रा बंडगर बोलत होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, सदस्य दिलीपदादा तळेकर , आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,

उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,माणिकराव साखरे, शिवशंकर माने,महेंद्र पाटील, सरडे बापू,औदुंबर भोसले,अमरजीतसिंह साळुंके,महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक,गणेश घोरपडे,बाळासाहेब महानवर आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की,या योजनेस काहीनी विरोध करत खिल्ली उडवली होती . परंतु विजयसिंह मोहिते पाटील यानी आपली राजकीय ताकद पणाला लावली . सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला . प्रथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साडे आठ लोकांच्या सहीचे निवेदन त्याना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकारात्मक प्रतिसाद दिला . अपुर्या पावसा मुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरली जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. क्रुष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात ‘या’ गावांत तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर; क्लिक करून वाचा, कोणती गावे?

सातोली येथे उसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्यावरून पिता-पुत्राला मारहाण करत खिशातील रक्कम घेतली काढून; करमाळा पोलिसात १० जणांवर गुन्हा दाखल

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील याना क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय मिळु नये म्हणून काहीनी या योजनेस खूप विरोध केला.पण विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यानी याचा अविरत पाठपुरावा केला आणि आज निधी मंजूर झाला. करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. सूर्य चंद्र असे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच नाव या निमित्ताने आता घेतले जाईल.

शहाजीराव देशमुख
माजी उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना.

litsbros

Comment here