महाराष्ट्रराजकारण

काल अजित पवार यांच्यासोबत असणारे खा.डॉ.अमोल कोल्हे यांचा आज यूटर्न ; म्हणतात “बाप नाही विसरायचा..”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

काल अजित पवार यांच्यासोबत असणारे खा.डॉ.अमोल कोल्हे यांचा आज यूटर्न ; म्हणतात “बाप नाही विसरायचा..”

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे.

“जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत”

असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल (2 जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, “काल शपथविधीची मला कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना आहे की मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबतच आहे. वडिलधाऱ्यांना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. काल शपथ घेणाऱ्यांचं मी अभिनंदन केलं. पण शपथ घेतली म्हणून अभिनंदन केलं, मात्र मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण हाच माझ्यासाठी धक्का होता. ज्यांनी शपथ घेतली त्यांचा तो निर्णय होता.

litsbros

Comment here