माढासोलापूर जिल्हा

माढेश्वरी अर्बन बँकेची रविवारी 13 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा – व्हा.चेअरमन अशोक लुणावत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढेश्वरी अर्बन बँकेची रविवारी 13 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा – व्हा.चेअरमन अशोक लुणावत

माढा / प्रतिनिधी – माढा येथील माढेश्वरी अर्बन को.ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता बँकेचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माढा येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न होणार असून या सभेला सर्व संचालक,सभासद,खातेदार,ठेवीदार व कर्जदार यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी केले आहे.

सध्या माढेश्वरी बँकेच्या माढा,टेंभुर्णी, पंढरपूर,लोणी काळभोर,करकंब, कुर्डूवाडी,सोलापूर व करमाळा येथे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने व सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून 8 शाखा सुरू आहेत.सध्या बँकेचे 10 हजारापेक्षा जास्त सभासद आहेत.बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून बँकेने सर्वांच्या सहकार्याने 200 कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे.बँकेच्या वतीने आर्थिक व्यवहाराबरोबरच विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना,मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,पंढरपूरला आषाढी एकादशीला जाणाऱ्या 400 वारकऱ्यांसाठी निवासाची,भोजनाची व चहापाण्याची व्यवस्था आदी सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ‘ हे’ असतील नवीन थांबे, कधीपासून होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर

उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत; मार्च एप्रिल महिन्यात सोळाशे एकरावरील केळीच्या बागा जमिनदोस्त

बँकेच्या सर्व सभासद व खातेदारांनी आधारकार्ड,पॅन कार्ड व फोटो आणि मोबाईल नंबर देऊन केवायसीची (KYC) पूर्तता करून घ्यावी.ज्या सभासद व खातेदारांनी वारसाची नोंद केली नाही त्यांनी नोंद करून घ्यावी असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले आहे.

फोटो ओळी-1) चेअरमन आमदार बबनराव शिंदे.

2) व्हा. चेअरमन अशोक लुणावत.

litsbros

Comment here