आम्ही साहित्यिक

***** मशेरीची तल्लफ *****

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

***** मशेरीची तल्लफ *****

                   ️️️️️

     आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण बघतो आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात झालयं पण असं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकालाच एक असं रोजचं शेड्युल ठरलेलं असतं आता काही काही शेड्युलला सुट्टी असते म्हणजे बघा रोज ऑफिसात जाणं आणि रविवारी घरी राहणं रोजची तीच तीच भाजी पोळी आणि आठवड्यातील गुरुवारचा उपवास म्हणजे खिचडी…खजूर…केळी…त्या निमित्ताने खाण्याची चॉईस आणि बदल सुद्धा विद्यार्थ्यांनी रोज तोच युनिफॉर्म घालणे आणि रविवारी मनासारखे कपडे घालून मनसोक्त फिरणे हे झालं पण एक असतं सकाळी उठल्यावर पहिल्यांदा प्रत्येकाचं शेड्युल एकच असतं ती म्हणजे प्रातर्विधी, मॉर्निंग वॉक, आंघोळ, पण त्यात पण महत्त्वाचं म्हणजे उठल्या उठल्या पहिला गाय छापचा बार भरायचा नाहीतर तंबाखूची मशेरी लावायची.

     महिला वर्गांची ही खास आवड कारण त्यांची कित्येक कामे मशेरी लावल्यामुळे अथवा थोडीशी तोंडात ठेवल्यामुळे सहजगत्या पार पडतात त्यांना काम करताना एक उत्साह निर्माण होतो मरगळ निघून जाते फार दिवसापूर्वी काय असायचं तवा काही गॅस किंवा स्टोव्ह नव्हता आपली व्हारांड्यात रोवलेली दोन किंवा तीन तोंडाची मातीची चूल आणि ती पेटवायसाठी शेणाची गवरी आणि लाकडं लागायचे तर सकाळी उठल्यावर पहिलं आजोबा…आजी… आई अन बा तसेच सगळी भावंडं तीन बोटाच्या चिमटीत ती चुलीतली राखुंडी घ्यायची आणि मग दहा पंधरा मिनिटांचा दात घासायचा कार्यक्रम चालायचा भले आजीच्या तोंडात दात नसले तरी राखेने ती हिरड्याला थोडी तरी मालिश करायची त्यात सुधारणा झाली दुपारच्या पारी तो चुलीतला लाकडी कोळसा आणि गवरीची राख पाट्यावर दोनदा चांगली बारीक वाटायची चाळणीने चाळून हे वस्त्रगाळ करून एखाद्या डब्यात किंवा मोठ्या तोंडाच्या बाटलीत भरायची नंतर सुधारणा होत गेली कोणी बाभळीच्या शेंगा चुलीत भाजून त्या वाटणात मिश्रण करू लागले.

     तर काहीजण कडुलिंबाच्या पेना एवढ्या जाड फांदीचा तुकडा चांगला बोटभर नाहीतर वितभर घ्यायचा त्याला एका टोकाला चांगला ऊस चावल्यासारखे करून पेंटिंगच्या ब्रशसारखं केसाळ बनवायचं आणि त्यांनी हिरड्या व दात चांगल्यापैकी घासायचे पुन्हा थोडी सुधारणा झाली लोकं जरा शिकली ही मिश्री त्यांना अवघड वाटू लागली त्यांनी आयतं कंपनीचं दंतमंजन वापरायला सुरुवात केली लोकं हळूहळू टूथ पावडरने दात घासू लागली पहिले बोटाने पावडर घेऊन दात घासायचे…उत्क्रांती झाली टूथ ब्रशच्या हँडलला धरून टूथ पावडर किंवा पेस्टने दात घासू लागले त्यात पण तंबाखूची पेस्ट बाजारात आली मिश्रीची तल्लभ या पेस्टने सांभाळली तर आता स्पर्धा सुरू झाली पेस्ट आणि ब्रशचे भरपूर प्रकार बाजारात दाखल होऊ लागले आणि अशा प्रकारे गवरीची राख ते टूथपेस्ट असा प्रवास सुरू झाला

     मिस्त्री किंवा पेस्ट अंगभूत गरज ठरली बाहेरगावी जाताना माणूस कपड्याच्या जोडा बरोबरच अंगाचा साबण…कंगवा…टूथपेस्ट आणि ब्रश आठवणीने घेऊ लागला एकंदर सारासार विचार केला तर मशेरी किंवा दंतमंजन दोन्ही एकच म्हणता येईल फक्त त्यातील घटक वेगवेगळे रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर आपण प्रथम दात स्वच्छ करतो दाताच्या फटीत किंवा तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले तर लाळ व उष्णता यामुळे ते कुजू लागतात रोगजंतूचा प्रादुर्भाव होतो पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंबाच्या काड्यांचा वापर व्हायचा कडुलिंब हे जंतुनाशक या व्यतिरिक्त खैर करंज…अक्रोड… इत्यादी तुरट चवीच्या झाडाच्या मृदू काड्या वापरत असायचे या झाडाच्या सालीमध्ये ट्यानिन नावाचे जे द्रव्य असते त्यांनी हिरड्या आकसतात व काडीच्या कुंचल्यामुळे दाताच्या फटीतील अन्नकण निघून जातात हिरडा…बेहडा…आवळा…त्रिफळा चूर्ण इत्यादीचे चूर्ण मधात मिसळून त्यांनी दात घासण्याची पद्धत होती वनस्पती शिवाय लाकडी कोळसा तो पण बाभळ…कडूनिंब…हिरडा… आवळा…या झाडाच्या लाकडापासून तयार केलेला आणि समुद्र केस यांच्या चूर्णाचाही वापर पूर्वी दंत मंजनमध्ये केला जात असे कोळसा… भाताची तूस… आणि गोवऱ्या जाळून मिळणारी राख याचाही वापर करायचे तंबाखू जाळून केलेली पूड मशेरी म्हणून आजही वापरली जाते

»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»»

 किरण बेंद्रे

 पुणे

7218439002

litsbros

Comment here