आम्ही साहित्यिक

🌹🌹 माझी कारभारीन 🌹🌹        हिला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹 माझी कारभारीन 🌹🌹

       हिला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा

                      ………………..

       माझी मालकीण सौ अलका बेंद्रे मालकीण ही फक्त स्थावरचीच नसून ती आपल्या आयुष्याची मालकीण असते संसार रथाचा टांगा दोन घोडे…दोन चाकं… अन टांग्यात बसलेले प्रवासी मुलगा.. सुनबाई…दोन मुली..दोन जावई दोन नाती… एवढे प्रवासी घेऊन 44 वर्षे अविरत टांगा चालवणाऱ्या माझ्या बसंतीस…

         माननीय बाबुराव कुलथे व वच्छला कुलथे यांच्या संसार वेलीला एकंदर सहा पारिजातकाची फुलं त्यापैकी शेंडेफळ म्हणजे सौ. अलका परीस रूपाने माझ्या जीवनात आली आणि माझं सोनं केलं 

             एवढेच काय कोरोनाच्या विळख्यातून… आय सी यू…व्हेंटिलेटर..मधून टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट मार्फत भायखळा रेल्वे रुग्णालया मार्फत उपचार घेऊन… माझा आदरणीय डॉक्टर परिवार व मालकीणीने हात धरल्यामुळे वरचा एकही जण मला शिवला सुद्धा नाही मालकिणीने एवढे अडथळे पार करून पुन्हा घरी सुखरूप हसत खेळत आणले.

       आता तुम्ही म्हणाल तू खूप छान लिहितो तू लेखक आहे पण काही वळणावर माझ्या विचाराची गाडी थांबते पण तिला समजल्यावर उदाहरणांचं पेट्रोल भरून लेख तयार व्हायला पडद्यामागची खरी नायिका ठरते वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा.

 

litsbros

Comment here