माढाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

कृष्णा खो-यातून 51टीमसी पाणी उजनीत सोडण्याच्या प्रकल्पास शासनाची तत्वतः मंजुरी – आमदार बबनराव शिंदे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कृष्णा खो-यातून 51टीमसी पाणी उजनीत सोडण्याच्या प्रकल्पास शासनाची तत्वतः मंजुरी – आमदार बबनराव शिंदे

माढा/ प्रतिनिधी —राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबई येथील निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बुधवारी 12 जुलै रोजी बैठक लावली होती.यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले,अधिक्षक अभियंता कुमार पाटील,चिफ इंजिनिअर गुनाले,कार्यकारी अभियंता योगेश सावंत उपस्थित होते.

त्यामध्ये कृष्णा खोऱ्यातून उजनी धरणात 51 टीएमसी पाणी सोडण्याच्या प्रकल्पाला शासनाची तत्वतः मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा असून या प्रकल्पाच्या कामासाठी सर्वेक्षण निधीचीही तातडीने तरतूद करून तसा आदेश पारित केल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.

दरवर्षी पावसाळा ऋतूत कोल्हापूर,सांगली व साताऱ्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते त्यामुळे या तीन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते परिणामी जनजीवन विस्कळित होते शिवाय काही वेळेस जीवीत व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते.हे नाहक वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर तेथे मोठ्या प्रमाणात जलसिंचन होईल.

याचा फायदा सोलापूर,सातारा,पुणे व मराठवाडा भागातील जनतेला होणार आहे त्यामुळे या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल ही बाब खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली तेंव्हा त्यांनी तातडीने या कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्षण प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली.या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,आमदार शहाजी पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला पिएसआय; प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आई वडीलांच्या कष्टाचे केले चीज

आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्यावे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देऊन सोलापूर जिल्ह्यासह इतर भागातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी भेट दिली आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या भागातील दुष्काळी भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. या भागातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येणार आहे त्यामुळे रोजगार वृद्धी होण्यास मदत होईल तसेच उरलेल्या भागात हरितक्रांती आणि आर्थिकक्रांती होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी – 1)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2)खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर

3) आमदार बबनदादा शिंदे

litsbros

Comment here