करमाळासोलापूर जिल्हा

खडकेवाडीत १ कोटी १६ लाख रुपयांच्या ‘या’ विकासकामांचे भूमिपूजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खडकेवाडीत १ कोटी १६ लाख रुपयांच्या ‘या’ विकासकामांचे भूमिपूजन

करमाळा – मौजे देवळाली ग्रामपंचायत अंतर्गत खडकेवाडी येथे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून व सोलापूर जिल्हा नियोजन समिती DPDC अंतर्गत
१ कोटी १६ लाख रु.च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा करमाळा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की विकासकामाच्या बाबतीत खडकेवाडी गावाला मोठी गरज होती त्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत 71,26,697 रु., खडकेवाडी गाव ते खडकेवाडी फाटा रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी 28,50,000 रु. किसन माने ॲडीशनल डीपीसाठी 12,50,000 रुपये, स्ट्रीट लाईट दिवे 2,00,000 रुपये,शाळा दुरुस्तीसाठी 2,00,000 रु एवढा भरघोस निधीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घालून ही कामे मंजूर केली आहेत, आणि आज या विकास कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले,
भविष्यात विविध विकासकामांच्या बाबतीत खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण आणखी कामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय शिंदे आणि प्रास्ताविक भाजपा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.आभार किरण शिंदे यांनी मानले.

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ झिंजाडे ,धर्मराज नाळे, देवळालीचे माजी उपसरपंच संदिपान कानगुडे, शहाजी बापू पाटील, बिटरगाव (श्री) चे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडी चे सरपंच प्रवीण बिनवडे,मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार ,पांडे ग्रामपंचायत उपसरपंच नितीन निकम,

हेही वाचा – व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर

ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे, झरे ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ घाडगे , जयंत काळे पाटील, गणेश महाडीक,नवनाथ खाडे, भैयाराज गोसावी, खडकेवाडी येथील बंडू शेळके ,पोपट शेळके ,गणेश माने ,शहाजी जाधव ,रमेश जगदाळे ,कल्याण शेळके, श्रीराम शेळके, जांबुवंत शेळके, आजिनाथ शेळके, उत्तरेश्वर शेळके ,संतोष चौधरी, बळीराम चौधरी ,मनोहर शेळके, भारत जाधव ,दयाराम जाधव, अशोक शेळके, अशोक जाधव, रघुनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य संजय चौधरी, सागर शिंदे ,अक्षय शेळके, प्रवीण शेळके ,ज्योतीराम शेळके, तुळशीराम शेळके ,अजित शिंदे ,संदीप शेळके, महेंद्र जाधव ,प्रज्वल जगदाळे ,दत्ता सुरवसे ,रोहिदास शेळके ,मनोहर शेळके, अमोल चौधरी ,शहाजी जाधव ,नितीन कानगुडे ,पंकज बिचितकर ,दिपक गायकवाड, विनोद इंदलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here