करमाळासोलापूर जिल्हा

खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ‘या’ गावातील विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ‘या’ गावातील विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर

करमाळा(प्रतिनिधी); ग्रामीण भागातील गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी २५१५ व १२३८ या लेखा शिर्षाखालील योजनांतर्गत विवीध विकास कामांना मंजूरी मिळण्यासाठी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी वेळोवेळी निवेदना द्वारे व प्रत्यक्ष भेट घेवून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निधी मिळण्यासाठी मागणी केली होती .

त्यांच्या प्रयत्नांमुळे करमाळा तालुक्यातील केम येथे हनुमान मंदीरा समोर सभा मंडपा साठी १० लाख रुपये व काळभैरवनाथ मंदीरा समोरील सभामंडपा साठी १० लाख रुपये , आवाटी येथिल येडेश्वरी मंदीरा समोरील सभामंडपासाठी १० लाख रु , कंदर मध्ये आण्णासाहेब पवार घर ते संजय थोरे घर रस्ता सुधारणे कामी १० लाख रु . , भालेवाडी गाव ते जूने गावठाण रस्ता याकरिता १० लाख रुपये ,चिखलठाण मध्ये दोन वेगवेगळ्या सिमेंट रोड करिता २० लाख रुपये ,

जिंती – पोमलवाडी डांबरीकरण रस्ता १० लाख रुपये , जिंती ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये , वांगी नं ३ व वांगी नं ४ येथे रस्त्या साठी प्रत्येकी १० लाख रुपये , तरटगाव येथे सामाजिक सभागृहासाठी १० लाख रुपये , करंजे गावात व्यायाम शाळेसाठी ५ लाख रुपये , झरे गावात आमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरणासाठी ५ लाख रुपये व चौधरी वस्ती रस्ता काँक्रिटिकरणासाठी १० लाख रू, मोरवड येथे व्यायामशाळेसाठी १० लाख रुपये , बीटरगाव श्री येथिल रस्त्या साठी १० लाख रुपये ,

हेही वाचा – लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक ‘या’ तारखेपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे यांची माहिती

मौजे मिरगव्हण येथील स्मशान भुमी साठी ५ लक्ष व रस्ता मुरुमीकरण व खडीकरणा साठी ५ लक्ष रु , आदी गावांसाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूरीचा शासन निर्णय दि १४ डिसेंबर रोजी पारीत झाला आहे .

litsbros

Comment here