करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
केत्तूर येथे चोरट्यांनी वृध्द महीलेस जबरी मारहाण करून सोने लुटले
केत्तर प्रतिनिधी:केत्तूर नं २ येथील गोपिकाबाई मल्हारी देवकाते(वय-७९)यांना दि. २२ जून च्या मध्यरात्री २ वाजता राहत्या घरी कोणी नसलेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून डोक्यावर काठीने जबरी मार देऊन जखमी करून कानातील व गळ्यातील पाऊण तोळ्याचा ऐवजाची चोरी करून चोरांनी पळ काढला.
या बाबत वृद्ध महिलेचे नातू नितिन देवकाते यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून तपास चालू केला आहे.
जखमी गोपिकाबाई देवकाते या सध्या जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे उपचार घेत आहेत.पुढील करमाळा पोलीस करत आहेत.
Comment here