करमाळाकेमसोलापूर जिल्हा

केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयास आदर्श शाळा पुरस्कार जाहीर; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयास आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

वाचा सविस्तर

केम(संजय जाधव); दि,१जुलै रोजी श्री पार्थ दादा पवार फाऊंडेशन वतीने राजाभाऊ तळेकर विद्यालय .केम या शाळेला आदर्श शाळा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ हे होते.

तर यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष संतोष वारे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर एपी,, ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष अच्युत काका पाटील पैलवान महावीर आबा तळेकर युवा सेनेचे सागर तळेकर निमंत्रक गौरव पाटील प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर मुख्याध्यापक मनोज तळेकर उपस्थित होते.

या वेळी मार्च 2023 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक तीन आलेले विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच शिवाजी प्राथमिक प्रशालेतील ए,टि, एस,परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी करोना काळात ज्या विद्यार्थ्यांचें पालक मृत्यू पावले अस्या पाल्याला एकूण दहा विद्यार्थाला गौरव पाटिल यांनी दत्तक घेतले.

या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सागर पडगळ म्हणाले की राजाभाऊ तळेकर विदयालय हे एक निसर्ग सानिध्यात आहे या शाळेची स्वच्छता, गुणवंत विद्यार्थी, येथील तज्ञ शिक्षक व शाळेची टाप,टिप या साठी या शाळेला पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा – अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले यंदाच्या शासकीय पूजाचे मानाचे वारकरी;मुख्यमंत्र्यांनी केली सपत्नीक शासकीय पूजा

केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?

तसेच या संस्थेच्या असलेल्या मागासवर्गीय वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २५बेड देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन यानी मानले या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here